दरवर्षी आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी गुरूची पूजा केली जाते. गुरूच भगवंतापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवतात, म्हणून हिंदू धर्मात गुरूला विशेष दर्जा देण्यात आला आहे. याशिवाय आषाढ पौर्णिमा हा गुरु वेद व्यास यांचा जन्मदिवस असून हा सण त्यांना समर्पित आहे. महर्षी वेद व्यास यांनी वेद आणि पुराणांची रचना केली आहे. यावर्षी गुरुपौर्णिमा १३ जुलै २०२२ रोजी बुधवारी साजरी केली जाणार आहे. या गुरुपौर्णिमेला चार अतिशय शुभ राजयोग तयार होत आहेत.

गुरुपौर्णिमेच्या दिवशी काही विशेष उपाय केल्यास खूप प्रभावी फळ मिळते. यंदा राजयोग तयार झाल्याने गुरुपौर्णिमेचे महत्त्व वाढले आहे. आज आपण, कोणत्या समस्येसाठी काय उपाय करावेत ते जाणून घेऊया.

  • कार्यात यश मिळवण्याचे उपाय :

गुरुपौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीनारायण मंदिरात नारळाचे तुकडे करून अर्पण करा. तसेच भगवान विष्णूची पूजा करावी. आपल्या क्षमतेनुसार दान करा. पिवळी मिठाई आणि कपडे दान करणे चांगले. असे केल्याने कुंडलीत गुरु दोषही दूर होईल आणि नशीबची साथ मिळू लागेल.

गुरु पौर्णिमेला तयार होणारा त्रिग्रही योग ‘या’ राशीच्या लोकांसाठी ठरणार फायदेशीर; उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता

  • आर्थिक समस्या दूर करण्यासाठी उपाय:

आर्थिक समस्या दूर करण्यासाठी गुरुपौर्णिमेला गरजू लोकांना चण्याची डाळ दान करा. पिवळी मिठाई दिल्याने गुरू बलवान होतो आणि आर्थिक स्थिती चांगली राहते.

  • लग्नात येणारे अडथळे दूर करण्यासाठी उपाय :

लग्नात येणारे अडथळे दूर करण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु यंत्राची स्थापना करा. गुरु यंत्राची दररोज विधिवत पूजा केल्याने, लवकरच विवाह योग तयार होतील.

  • विद्यार्थ्यांसाठी उपाय :

ज्यांना अभ्यासात अडचणी येत आहेत किंवा अपेक्षित यश मिळत नाही त्यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गायीची सेवा करावी. गुरूंचा आदर करा आणि गीता वाचन करा. शक्य असल्यास गीतेचा काही भाग रोज वाचावा. जलद लाभ होईल. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंची पूजा करून आशीर्वाद घ्या. त्यांना पिवळे वस्त्र दान करा. असे केल्याने लवकर भाग्योदय होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)