Gaj Kesari Rajyog Will Positive Impact These Zodiac Sign: ज्योतिषस्त्रानुसार आपल्या आयुष्यातील घडामोडींवर ग्रह ताऱ्यांचा परिणाम होत असतो. जेव्हा एक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, तेव्हा त्याचा शुभ आणि अशुभ असे दोन्ही परिणाम दिसून येतात. त्याचा काही राशींवर चांगला परिणाम होतो. ज्योतिषशास्त्रात गुरु आणि चंद्र हे दोन्ही शुभ ग्रह मानले जातात. जेव्हा हे दोन ग्रह एकत्र येतात तेव्हा त्याचा माणसाच्या जीवनावर खूप सकारात्मक परिणाम होतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, २४ मे रोजी मेष राशीत चंद्र-गुरु युतीमुळे गजकेसरी योग जुळून येतोय. अशा स्थितीत गजकेसरी योगाच्या निर्मितीमुळे काही राशीच्या लोकांच्या आयुष्यात चांगल्या घडामोडी घडून येऊ शकतात. या योगाचा फायदा काही नशीबवान राशींना होणार असल्याचे समजतेय. तुमच्याही राशीला काय कसा लाभ होऊ शकतो हे पाहूया…चला जाणून घेऊया त्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत.
चंद्र-गुरु युतीमुळे गजकेसरी योग! ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा?
तूळ
तूळ राशीच्या लोकांसाठी गजकेसरी योग अतिशय शुभ ठरु शकतो. गजकेसरी योगाच्या निर्मितीमुळे या राशींचे अच्छे दिन सुरु होऊ शकतात. या काळात व्यापारात वृद्धी झाल्याने आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्हाला गुंतवणुकीचा फायदा होणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून भरपूर लाभ होऊ शकतो. तुमची प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. नोकरदार लोकांना त्यांच्या करिअरमध्ये यश प्राप्त होऊ शकते. नोकरदार लोकांसाठी पदोन्नती आणि वेतनवाढीची शक्यता आहे. या काळात विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी असणार आहे.
धनू
गजकेसरी योगामुळे धनु राशीच्या लोकांच्या कौटुंबिक जीवनात चांगले बदल पाहायला मिळू शकतात. तुम्हाला लाभ होण्याची दाट शक्यता आहे. विदेशात फिरण्याचं स्वप्न आता पूर्ण होऊ शकतं. भूतकाळात केलेल्या कठोर मेहनतीचं फळ मिळण्याची वेळ आता येणार आहे. तुम्हाला अचानक कुठूनतरी अनपेक्षित पैसे मिळू शकतील. शारीरिक आणि मानसिक तणावातून आराम मिळू शकतो. तसंच या काळात तुम्ही नोकरी किंवा व्यवसायासाठी प्रवास करू शकता.
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांना गजकेसरी राजयोगाच्या निर्मितीमुळे खूप फायदा होऊ शकतो. व्यापारी, दुकानदार, व्यावसायिक यांची आर्थिक स्थिती सुधारु शकते. कर्जापासून मुक्ती मिळू शकते. तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवे स्रोत उघडू शकतात. या राशींच्या लोकांना काहीतरी गोड बातमी मिळण्याची शक्यता आहे. व्यापारातून तुम्हाला प्रचंड पैसा कमावता येऊ शकतो. तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. प्रेमविवाह होण्याचीही शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून प्रत्येक कामात सहकार्य मिळू शकणार आहे.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.