Gajkesri Rajyog: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी राशी बदलून शुभ आणि अशुभ योग बनवतात. गुरू बृहस्पति मीन राशीत विराजमान आहे आणि २५ जानेवारीच्या रात्री चंद्र ग्रह मीन राशीत प्रवेश करेल. त्यामुळे गजकेसरी योग तयार होईल. ज्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल. परंतु अशा ३ राशी आहेत, ज्यांच्यासाठी हा योग शुभ आणि फायदेशीर ठरू शकतो. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

वृषभ राशी

गजकेसरी राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण हा राजयोग तुमच्या राशीनुसार कर्माच्या ठिकाणी तयार होईल. त्यामुळे बेरोजगारांना यावेळी नोकरी मिळू शकते. यावेळी तुमच्या धनात अचानक वाढ होईल. यासोबतच तुमचा समाजातील मान- सन्मान वाढेल. याकाळात तुम्हाला तुमच्या मुलाकडून चांगली बातमी मिळू शकते. त्याचबरोबर व्यावसायिकांना चांगला नफा मिळू शकतो. तसेच, यावेळी तुम्हाला तुमच्या जीवनसाथीचा पूर्ण पाठिंबा मिळेल. या काळात तुम्ही एखादे नवीन काम सुरू करू शकता.

कर्क राशी

गजकेसरी राजयोग कर्क राशीसाठी शुभ ठरू शकतो . कारण हा राजयोग नवव्या घरात तयार होत आहे. म्हणूनच यावेळी तुम्ही भाग्यवान होऊ शकता. यासोबतच जे राजकारणाशी संबंधित आहेत, त्यांना यावेळी काही पद मिळण्याची शक्यता आहे. तसंच नवीन नोकरी शोधणाऱ्यांना या काळात नोकरी मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर नोकरी-व्यवसायात यश मिळू शकते.

( हे ही वाचा: ‘नियती पालट राजयोग’ बनल्याने ‘या’ राशींचे नशिब पालटणार? शुक्र-गुरू एकत्र देतील प्रचंड धनलाभाची संधी)

कन्या राशी

गजकेसरी राजयोग लोकांसाठी शुभ आणि फायदेशीर सिद्ध होऊ शकतो. कारण हा राजयोग तुमच्या राशीतून सप्तम भावात तयार होणार आहे. जे वैवाहिक जीवन आणि भागीदारीचे स्थान मानले जाते. त्यामुळे याकाळात तुम्ही नवीन काम सुरू करू शकता. तसंच सुरू असलेल्या व्यवसायाचा विस्तार करू शकता. तसंच याकाळात तुम्हाला अडकलेले पैसे पुन्हा मिळू शकतात. या काळात तुमचे वैवाहिक जीवनही चांगले राहील. तसंच तुमच्या जोडीदाराच्या सल्ल्याने तुम्ही काम कराल त्यात तुम्हाला यश मिळेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(वरील बातमी माहिती आणि गृहितके यांवर आधारित आहे )