Ganesh Chaturthi Mahashubh Yog: दरवर्षी १० दिवसांसाठी सुख-समृद्धी देणारे भगवान गणेश पृथ्वीवर येतात आणि आपल्या भक्तांमध्ये राहतात. गणपती बाप्पा भक्तांचे विघ्न दूर करतात आणि त्यांना सुख-समृद्धीचे आशीर्वाद देतात. या वर्षी गणेश चतुर्थीला एक-दोन नव्हे तर पाच अतिशय शुभ योग तयार होत आहेत. सुख आणि समृद्धीचा दाता गणपती बाप्पा येताच ते ५ राशीच्या लोकांवर धनाचा वर्षाव करेल.

या वर्षी २७ ऑगस्ट, भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थीला सर्वार्थसिद्धि योग, रवि योग, ब्रह्म योग, इंद्र योग आणि प्रीती योग यांचा संयोग होतो आहे. या दिवशी गणपती बाप्पा विराजमान होतील आणि ५ राशींच्या लोकांना फारच शुभ परिणाम देतील. चला तर मग जाणून घेऊ या गणेश चतुर्थी कोणत्या राशींसाठी भाग्यवान ठरेल.

मेष राशी (Aries Horoscope)

गणेश चतुर्थी मेष राशीच्या लोकांसाठी शुभ असेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. गणपती बाप्पाचे नाव घेऊन केलेले काम यशस्वी होईल. गुंतवणुकीसाठी वेळ चांगला आहे. नवीन संधी मिळेल.

कर्क राशी (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांना गणपती बाप्पांची कृपा मिळेल आणि करिअरमध्ये नवीन संधी येतील. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. प्रगतीसाठी नवीन दरवाजे उघडतील. प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक स्थिती सुधारेल.

तूळ राशी (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी हा शुभ योग आहे. हे योग जीवनातील सर्व क्षेत्रात चांगले परिणाम देतील. कामकाज तसेच वैयक्तिक जीवनही चांगले राहील. सिंगल लोकांना जोडीदार मिळू शकतो. लग्न ठरू शकते. नशीब साथ देईल, त्यामुळे मागील अडचणींचे कामे पूर्ण होतील.

मकर राशी (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांना शुभ बातमी मिळू शकते, ज्याचे ऐकून तुम्ही आनंदित व्हाल. अडकलेले पैसे मिळाल्याने दिलासा मिळेल. बँक बॅलन्स वाढेल. प्रवासावर जाऊ शकता. कामाच्या ठिकाणी सर्वांचा पाठिंबा मिळेल. तुमची स्तुती होईल.

कुंभ राशी (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांचं उत्पन्न वाढेल. नवीन स्रोतांमधून पैसा मिळेल. व्यवसायात फायदा होईल. गुंतवणूक करू शकता. तसेच हा वेळ तुमची सर्जनशीलता दाखवण्याचा आहे. सन्मान मिळेल. पैसे वाचवण्यात यश मिळेल.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)