Ganesh Chaturthi 2025 Horoscope: २७ ऑगस्टपासून गणेश चतुर्थीचा शुभारंभ झाला असून, गणरायाचे हे ११ दिवसांचे मंगलमय पर्व अनंत चतुर्दशीपर्यंत चालणार आहे. या पवित्र काळात बाप्पाच्या कृपेचा वर्षाव होणार तो काही मोजक्या राशींवर! होय… ‘या’ ६ भाग्यवान राशींना या काळात केवळ आनंद, सुख, संपत्तीच नाही, तर करिअर, व्यवसाय आणि प्रेमसंबंधांमध्येही मोठे बदल अनुभवायला मिळणार आहेत.

अनंत चतुर्दशीपर्यंत बाप्पाची कृपा; ६ राशींवर होणार धनवर्षाव?

मेष

गणेशोत्सवाचे हे सर्व दिवस मेष राशीच्या लोकांसाठी सुवर्णसंधी ठरणार आहेत. बेरोजगारांना नोकरी, तर करिअरमध्ये प्रगतीची नवी दारे उघडतील. आर्थिक स्थिती मजबूत होणार असून, नवे उत्पन्नाचे स्रोत मिळू शकतात. व्यापाऱ्यांसाठीही नवा प्रकल्प किंवा धाडसी पाऊल फायद्याचे ठरेल.

वृषभ

गणेशोत्सव काळात वृषभ राशीवाल्यांचा बँक बॅलन्स झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये धावपळ वाढेल; पण तिचे फळही गोड असेल. अचानक पदोन्नती किंवा प्रतिष्ठेत वाढ होऊ शकते. विदेशात नोकरीचे स्वप्न बघणाऱ्यांचीही इच्छा पूर्ण होऊ शकते. विरोधक मागे पडतील आणि प्रेमसंबंधातील गोडी वाढेल.

सिंह

हा काळ सिंह राशीसाठी आनंददायी ठरणार आहे. एखादी मोठी खूशखबर मिळू शकते, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता. व्यापारात प्रचंड नफा, नोकरीत यश, तर प्रेमात नवीन जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. मात्र, आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

वृश्चिक

या काळात वृश्चिक राशीवाल्यांना करिअरमध्ये झेप संधी आहे. मेहनतीचे फळ मिळून पद, प्रतिष्ठा वाढणार. नवीन नोकरी किंवा पुरस्कार मिळण्याचे योग आहेत. व्यापाऱ्यांची योजनाही यशस्वी ठरेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील आणि अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकतो.

मकर

गणपती महाराजांची मकर राशीवर विशेष कृपा होणार आहे. प्रॉपर्टी, वाहन खरेदीचे योग आहेत. न्यायालयीन प्रकरणामध्ये विजय, कामात भाग्याचे सहकार्य आणि कुटुंबात सुख-समृद्धी वाढणार. या काळात मिळणारी मोठी उपलब्धी आयुष्याची दिशा बदलू शकते.

मीन

हा काळ मीन राशीसाठी विवाह व करिअर दोन्हींसाठी शुभ आहे. ज्यांचा विवाह ठरत नाही, त्यांना जोडीदार मिळेल. पदोन्नतीची संधी, समाजात मान-सन्मान आणि लोकांमध्ये प्रतिष्ठा मिळेल. अडकलेली कामे मार्गी लागतील व मनोकामना पूर्ण होतील.

तर मंडळी, जर तुमची रास या सहापैकी एखादी असेल, तर सज्ज व्हा! कारण- गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत बाप्पा तुमचं आयुष्य सोन्यासारखं उजळवणार आहेत.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)