Ganesha Jayanti and Ganesh Chaturthi : बाप्पा हा सर्वांचा आवडता देवता आहे. लहान मुलांपासून ते वृद्ध लोकांपर्यंत सर्वांनाचा गणपती आवडतो. त्यामुळे गणेश चतुर्थी असो किंवा गणेश जयंती आपल्या देशात उत्साहात साजरी केली जाते. गणेश चतुर्थी आणि गणेश जयंतीला बाप्पाचे भक्त मनोभावे गणपतीची पूजा करतात आणि उपवास धरतात पण तुम्हाला माहिती आहे का गणेश चतुर्थी आणि गणेश जयंतीमध्ये काय फरक आहे? अनेकांना याविषयी माहिती नाही. आज आपण त्याविषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत.

गणेश चतुर्थी आणि गणेश जयंती केव्हा साजरी केली जाते?

गणेश चतुर्थी ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात (भाद्रपद) महिन्यात साजरी केली जाते तर गणेश जयंती ही जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात येते. हे दोन्ही दिवस शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरे केले जातात. या तिथींना विशेष महत्त्व आहे.

गणेश जयंती आणि गणेश चतुर्थी का साजरी केली जाते?

गणेश चतुर्थी म्हणजेच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती कैलास पर्वतावरून पृथ्वीवर आले होते, अशी मान्यता आहे तर गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पाचा जन्म झाला होता, असे म्हणतात. त्यामुळे या दोन्ही तिथीला धार्मिक महत्त्व आहे.

हेही वाचा : वसंत पंचमीला लक्ष्मी नारायणसह निर्माण होणार पंच दिव्य योग! माता लक्ष्मीची होईल ‘या’ राशींवर कृपा

गणेश चतुर्थी आणि गणेश जयंतीमध्ये काय फरक आहे?

गणेश जयंतीच्या दिवशी गणपतीचा जन्मोत्सव साजरा केला जातो. पौरोणिक कथेनुसार, या दिवशी गणपतीचा जन्म झाला होता. या दिवशी मध्याह्न मुहूर्तावर गणपतीची पूजा केली जाते आणि पौरोणिक कथेनुसार, गणेश चतुर्थीच्या दिवशी कैलास पर्वतावरून गणपती आई पार्वतीबरोबर पृथ्वीवर आले होते. गणेश चतुर्थी ही विनायक चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी या नावाने सुद्धा ओळखली जाते.

माघी गणेश जयंती

गणेश जयंतीच्या दिवशी गणपतीची पूर्जा केली जाते. आज माघी गणेश जयंती आहे त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, गणेश जयंतीची तिथी ही १२ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ५.४४ वाजता सुरू झाली असून १३ फेब्रुवारी दुपारी २.१४ वाजता ही तिथी संपेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)