Ganpati Bappa Favorite Zodiac Signs: भगवान गणेश यांची कृपा जीवनात सर्व सुख आणि भरपूर धन आणते. ५ राशींवर गणपती बाप्पाची नेहमी खास कृपा असते कारण या त्यांना आवडत्या राशी आहेत.
२७ ऑगस्टला गणेश चतुर्थी आहे आणि या दिवसापासून पुढचे १० दिवस गणेश उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होणार आहे. घराघरात गणपती बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाईल. ज्योतिषानुसार ५ राशींवर गणपती बाप्पा नेहमी कृपादृष्टी ठेवतात. म्हणजेच या बाप्पाच्या आवडत्या राशी आहेत.
मेष राशी (Aries Horoscope)
मेष राशीचे स्वामी मंगळ ग्रह आहेत आणि ही गणपती बाप्पाची आवडती रास आहे. या राशीचे लोक धाडसी आणि निडर असतात. त्यांचे काम सहज पूर्ण होते. या लोकांना कधीही पैशांची कमतरता जाणवत नाही. नोकरी आणि व्यवसायात चांगली प्रगती करतात.
मिथुन राशी (Gemini Horoscope)
मिथुन राशीचे स्वामी बुध आहेत आणि या राशीवरही गणपती बाप्पाची विशेष कृपा असते. या लोकांची करिअरमध्ये चांगली प्रगती होते. विशेषतः व्यापारात मोठा फायदा होतो. तसेच बुद्धी आणि वाणीच्या जोरावर समाजात मान-सन्मान मिळवतात.
वृश्चिक राशी (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीचे स्वामी मंगळ ग्रह आहेत आणि या राशीचे लोक थोडे आक्रमक स्वभावाचे असतात. हे लोक जेव्हा अडचणीत सापडतात, तेव्हा गणपती बाप्पा त्यांचे नेहमी रक्षण करतात आणि त्यांना संकटातून बाहेर काढतात.
मकर राशी (Capricorn Horoscope)
मकर राशीचे स्वामी शनि ग्रह आहेत. या राशीवर गणपती बाप्पाबरोबरच शनीदेवाचीही कृपा असते. या लोकांना आयुष्यात संघर्ष करावा लागतो, पण त्याचे फळ गणपती बाप्पा धन, समृद्धी आणि यशाच्या रूपात देतात. या राशीचे लोक आयुष्यात जे काही मिळवायचे ठरवतात, ते गणपती बाप्पाच्या कृपेने नक्की मिळवतात.
कुंभ राशी (Aquarius Horoscope)
कुंभ राशीचे स्वामी शनि ग्रह आहेत. गणपती बाप्पाच्या कृपेने हे लोक लहान वयातच यश, पैसा, सुखी कुटुंब आणि चांगले करिअर मिळवतात. त्यांना नशीब साथ देतं. व्यवसाय केल्यास मोठा व्यवसाय उभारतात. नोकरी केल्यास उच्च पद मिळवतात.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)