Shani Transit In Aquarius : नवीन वर्ष सुरू व्हायला केवळ ९ दिवस उरले आहेत, येणारे २०२४ हे वर्ष कसे असेल असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येऊ लागला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, पुढील वर्षात कर्माचा दाता शनिदेव वर्षभर कुंभ राशीत भ्रमण करणार आहेत. शिवाय तो या काळात तांब्याच्या पाऊलांनी चालणार आहेत. त्यामुळे २०२४ मध्ये काही राशींचे नशीब उजळू शकते. या राशींना अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तर या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

वृषभ रास

वृषभ राशीच्या गोचर कुंडलीत शनिदेव तांब्याच्या पाऊलांनी प्रवास करणार आहेत. त्यामुळे करिअर आणि व्यवसायात तुमची प्रगती होऊ शकते. तसेच, शनिदेव २०२४ मध्ये तुमच्या राशीतून दहाव्या स्थानी प्रवेश करतील. त्यामुळे बेरोजगारांना नवीन नोकरीची संधी मिळू शकते. या काळात तुमच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. तसेच, तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. तर नोकरदारांचे प्रमोशन होण्याची दाट शक्यता आहे.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांसाठी शनिदेवाचे गोचर शुभ ठरू शकते. कारण शनिदेव तुमच्या राशीचे स्वामी बुधचे मित्र आहेत. तसेच २०२४ मध्ये संपूर्ण वर्षभर शनिदेव तुमच्या राशीतून सहाव्या स्थानी भ्रमण करतील, त्यामुळे तुम्हाला न्यायालयीन प्रकरणांमध्ये यश मिळू शकते. शत्रूंवर विजय मिळवण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल. तसेच, या काळात तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता.

हेही वाचा- २०२४ वर्षातील पहिले ४ महिने ‘या’ राशींसाठी ठरणार सुवर्णकाळ? गुरु मेष राशीत प्रवेश करताच नशिबाला कलाटणी मिळणार?

कुंभ रास

शनिदेवाचे गोचर कुंभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. कारण शनिदेव तुमच्या राशीतून लग्न स्थानी प्रवेश करणार आहेत. तसेच ते तुमच्या राशीचे स्वामी आहेत. त्यामुळे या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होऊ शकते. दुसरीकडे, व्यवसायातून तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. तसेच या काळात केलेली गुंतवणूक भविष्यात फायदेशीर ठरु शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)