Guru and shukra asta 2024: ज्योतिषशास्त्रात देवतांचे गुरु बृहस्पति आणि दैत्यांचे गुरु शुक्र यांना खूप महत्त्वपूर्ण मानले जाते. या दोन्ही ग्रहांच्या स्थितीत बदल होताच त्याचा प्रभाव शुभ कार्यावरदेखील होतो. या दोन्ही ग्रहांच्या अस्त होण्याने मंगल कार्य करणं थांबवले जातात. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्राचा २८ एप्रिल रोजी सकाळी ५ वाजून १७ मिनिटांनी मेष राशीत अस्त झाला होता, जो २९ जून २०२४ रोजी संध्याकाळी ७ वाजून ३७ मिनिटांनी मिथुन राशीत उदय होणार आहे.
तसेच गुरु ग्रह वृषभ राशीत ७ मे रोजी रात्री १० वाजून ८ मिनिटांनी अस्त होणार आहे, ज्याचा ६ जून रोजी उदय होईल. गुरु आणि शुक्र एकत्र अस्त होण्याचा हा संयोग जवळपास २४ वर्षांनंतर आला आहे. शुक्र आणि गुरुच्या अस्त होण्याने काही राशींच्या व्यक्तींना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
वृषभ
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी गुरु आणि शुक्राचे अस्त होणे फारसे लाभकारी मानले जाणार नाही. या राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागेल. लहान गोष्टींसाठीदेखील कठोर मेहनत घ्यावी लागले, तसेच वरिष्ठांसोबतचे नातेसंबंध खराब होण्याची शक्यता आहे. सहकर्मचाऱ्यांमुळे तुमच्या कामात अडथळे निर्माण होतील, यामुळे तुम्ही तणावात राहाल. या काळात खर्चावर नियंत्रण ठेवा, कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर पैसे खर्च करावे लागतील.
सिंह
सिंह राशीमध्ये गुरु दहाव्या तर शुक्र नवव्या घरात अस्त होणार आहे. या दोन्ही ग्रहांचा संयोग सिंह राशीच्या व्यक्तींसाठीदेखील खूप कष्टदायक सिद्ध होईल. मुलांच्या भविष्याची काळजी राहील. कामाच्या निमित्ताने दूरचे प्रवास करावे लागतील, पण यातून तुमचे हित साध्य होणार नाही. तुमचे ध्येय प्राप्त करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. व्यवसायात बऱ्याचदा अपयशाला सामोरे जावे लागेल. वैवाहिक जीवनातही मतभेद होतील. आरोग्याची विशेष काळजी घ्या.
हेही वाचा : शुक्र करणार मालामाल! ‘या’ तीन राशीधारकांना मिळणार सुख, समृद्धी व संपत्तीचे सुख
वृश्चिक
वृश्चिक राशीत शुक्र सहाव्या तर गुरु सातव्या घरात अस्त होणार आहे. या राशीच्या व्यक्तींना या काळात भाग्याची साथ मिळणार नाही. खूप मेहनत करून गोष्टी साध्य कराव्या लागतील. गुंतवणूक करण्याआधी विचार करा, धनहानीचा सामना करावा लागू शकतो.