Guru Ast 2025 Impact in Marathi: ज्योतिष्यशास्त्रामध्ये प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनुसार राशीमध्ये बदल करतो. ज्योतिषशास्त्रानुसार बृहस्पति ग्रहाला ज्ञान, बुद्धी, धर्म, संपत्ती, अध्यात्म, शिक्षण आणि कर्म यांचा कारक मानले जाते. ज्योतिषशास्त्रामध्ये गोचर फार महत्त्वाचं समजलं जातं. ग्रहांच्या राशी परिवर्तनाला गोचर म्हणतात. सुख, संपत्ती, वैभव, ऐषाराम आणि ऐश्वर्याचा कारक असलेल्या गुरुचा राशी बदल अनेकार्थांनी महत्त्वाचा ठरतो. देवांचा गुरु असलेल्या गुरुला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी सुमारे एक वर्ष लागते. अशा स्थितीत पुन्हा एका राशीत येण्यासाठी १२ वर्षे लागतात. अशा स्थितीत गुरु ग्रह अस्त आणि वक्री अवस्थेत जातो. गुरु सुमारे एक वर्षानंतर मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. यासोबतच गुरु १२ जून रोजी संध्याकाळी ७:३७ वाजता मिथुन राशीत अस्त होईल आणि सुमारे २७ दिवस अस्त राहिल्यानंतर ९ जुलै रोजी देवगुरु उदयास येणार आहेत. त्यामुळे, गुरु ग्रहाच्या अस्ताने काही राशींना भरपूर फायदे मिळण्याची शक्यता आहे. मोठा धनलाभ होऊ शकतो. जाणून घेऊया कोणत्या राशींना फायदा होऊ शकतो.

जून महिन्यात ‘या’ राशींचा भाग्योदय?

मेष

गुरुदेवाच्या कृपेने मेष राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात. या राशीच्या लोकांना या काळात भरपूर फायदा होण्याची शक्यता आहे. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफरदेखील मिळू शकते. नोकरदार लोकांना नोकरीत बढती मिळू शकते. व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. गुरु कृपेने तुम्ही पैशाची बचत करण्यात यशस्वी होऊ शकता. तुम्ही देश-विदेशात पर्यटनासाठी जाऊ शकता. व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. कुटुंबात सुख-शांती नांदण्याची शक्यता आहे.

वृषभ

गुरुदेवाच्या कृपेने तुमचं नशीब उघडण्याची शक्यता आहे. उत्पन्नात घसघशीत वाढ होण्याची शक्यता आहे. या कालावधीत विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. पैशाची आवक या काळात वाढण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये तुम्हाला काही अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी हा काळ फलदायी ठरू शकतो. या काळात कौटुंबिक सदस्यांसोबत तुमचे संबंध पूर्वीपेक्षा अधिक घट्ट आणि मजबूत होण्याची शक्यता आहे. तुमच्या आयुष्यात तुम्हाला आनंदच आनंद मिळण्याची शक्यता आहे.

धनू

गुरुदेवाच्या कृपेने धनू राशीतील लोकांना प्रत्येक कामात नशिबाची पूर्ण साथ मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला व्यवसायात नफा मिळू शकतो. अनपेक्षित पैसे मिळू शकतात. शेअर मार्केटमध्ये तुम्हाला आर्थिक लाभही मिळू शकतो. परदेश प्रवासाचे स्वप्न पाहणाऱ्यांची स्वप्न पूर्ण होऊ शकतात. या काळात गुंतवणूक करणेदेखील तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकते. या काळात तुम्ही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. कामाच्या ठिकाणीही तुमच्या कामाचं कौतुक होऊ शकते. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभही मिळू शकतो.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे, लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)