Gajkesari Rajyog 2025 : गजकेसरी राजयोग हा अतिशय शुभ योग आहे. जेव्हा कुंडलीत चंद्र आणि गुरू एकाच घरात येतात तेव्हा हा योग निर्माण होतो. मिथुन राशीमध्ये चंद्र आणि गुरू एकत्र येणार आहे. कारण २२ जुलै ला सकाळी ८ वाजून १४ मिनिटांनी चंद्राचे गोचर होणार आहे. तसेच गुरूचा सुद्धा प्रवेश मिथुन राशीमध्ये होत आहे.
मिथुन राशीमध्ये गुरू आणि चंद्राची युती निर्माण होणार आहे, ज्यामुळे गज केसरी राजयोग निर्माण होईल. गजकेसरी योगाचे अनेक फायदे काही राशींवर दिसून येतात. या राजयोगामुळ काही राशींच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. करिअर, व्यवसाय आणि शिक्षणामध्ये चांगले परिणाम दिसू शकतात. सुख समृद्धी, सकारात्मक विचार, नेतृत्व क्षमता आणि मानसिक शांती लाभू शकते. जाणून घेऊ या त्या राशी कोणत्या आहेत.
मिथुन राशी (Gemini Zodiac)
गजकेसरी राजयोगामुळे मिथुन राशीच्या लोकांना व्यवसायात चांगला फायदा दिसून येईल. हे लोक करिअरसंबंधित मोठे निर्णय घेऊ शकतील. अडकलेले कामे हे लोक पूर्ण करतील आणि नवीन डील्स लॉक करून धनलाभाचे मार्ग उघडू शकतात. वैवाहिक जीवनात सुख समृद्धी वाढेल. हे लोक वाहन किंवा मोठी संपत्ती खरेदी करू शकतात.
कन्या राशी (Virgo Zodiac)
गजकेसरी राजयोगामुळे कन्या राशीच्या लोकांना प्रेम जीवनात सुख शांती प्राप्त होईल. कामाला घेऊन तणाव कमी होईल. भूमि भवन, वाहन इत्यादी भौतिक सुख संपत्ती प्राप्त होईल आणि गुरूच्या प्रभावाने काही लोक शिक्षण क्षेत्रात चांगली प्रगती करतील. विवाह कार्यात येणाऱ्या अडचणी दूर होईल. तसेच या लोकांना मानसिक शांतता लाभेल.
धनु राशी ( Sagittarius Zodiac)
गजकेसरी राजयोग धनु राशीच्या लोकांसाठी अत्यंत फायद्याचा ठरणार आहे. यामुळे या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढू शकतो. या लोकांनी एखादे नवीन काम सुरू केले असेल तर ते पूर्ण होऊ शकतात. व्यवसायात वाढ होईल. धनप्राप्तीचे योग निर्माण होईल. विदेश संबंधित कार्य पूर्ण होतील. हा काळ या राशीसाठी उत्तम राहीन. या लोकांवर आईवडीलांचे आशीर्वाद दिसून येईल. अपत्या संबंधित अडचणी दूर होईल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)