Gajkesari Rajyog 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रात, गुरु हा सर्वात महत्त्वाचा ग्रह मानला जातो, जो सध्या मिथुन राशीत आहे. १२ वर्षांनी तो या राशीत आल्याने काही राशींना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. गुरु एका राशीत एक वर्ष राहिल्याने तो कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी युती करेल, ज्यामुळे शुभ आणि अशुभ योग तयार होतील. यात गुरुचा १८ मे रोजी धनु राशीत चंद्राशी संयोग होणार असल्याने गजकेसरी राजयोग निर्माण होईल. या राजयोगाच्या निर्मितीमुळे १२ पैकी ३ राशींच्या लोकांना भरपूर लाभ मिळू शकतो. पण, नेमका कोणत्या राशींना फायदा होईल जाणून घेऊ…

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्राने १५ मे रोजी धनु राशीत प्रवेश केला आणि १८ मेपर्यंत तो या राशीत राहील. जेव्हा गुरु ग्रह चंद्राच्या मध्यस्थानी (पहिल्या, चौथ्या, सातव्या आणि दहाव्या घरात) असतो, तेव्हा गजकेसरी राजयोग तयार होतो.

धनु (Sagittarius)

धनु राशीच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोग फलदायी ठरू शकतो. या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळवू शकतात. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. तुमच्यात एकमेकांप्रती जबाबदारीची भावना निर्माण होईल. यासह जमिनीच्या व्यवहारासंबंधित कोणतीही जुनी इच्छा पूर्ण होऊ शकते. व्यवसायातही यश मिळण्याची शक्यता आहे. यासह उत्पन्नातही झपाट्याने वाढ होऊ शकते. निर्णय घेण्याची क्षमताही वाढू शकते.

तुळ (Libra)

तुळ राशीच्या लोकांसाठी गुरु आणि चंद्राचा गजकेसरी राजयोग खूप शुभ ठरू शकतो. या राशीच्या लोकांचा कल अध्यात्माकडे जास्त असू शकतो. कोणत्याही कामात तुम्ही करत असलेला संघर्ष आता तुम्हाला यश मिळवून देऊ शकतो. तुम्हाला तुमच्या भावंडांकडून पूर्ण सहकार्य मिळू शकेल. उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. तुमचा कामावरही चांगला वेळ जाईल.

सिंह (Leo)

सिंह राशीच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोग अनुकूल ठरू शकतो. या राशीच्या लोकांना आर्थिक संकटातून मुक्तता मिळू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. यासह अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. या काळात मुलांची प्रगतीही दिसून येईल. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला गुप्त संपत्ती मिळू शकते.