Transit Guru : वैदिक ज्योतिषशास्त्रात गुरु ग्रहाला देवगुरु आणि बृहस्पती असे म्हणतात. गुरु हळूहळू दुसऱ्या राशीत संक्रमण करतो. सध्या गुरु मेष राशीत आहे. गेल्या वर्षी २२ एप्रिल रोजी गुरुने मेष राशीत प्रवेश केला होता. आता सुमारे १२ महिने आणि ८ दिवसांनी गुरु ग्रह आपल्या राशी बदलणार आहे. १ मे रोजी गुरु शुक्राच्या वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. गुरुच्या शुभ स्थितीमळे जीवनात सुख समृद्धी नांदू शकते. गुरुच्या राशी परिवर्तनामुळे कोणत्या राशींचे भाग्य उजळू शकते जाणून घेऊ…

कन्या

वृषभ राशीत गुरुच्या प्रवेशामुळे कन्या राशीच्या लोकांना लाभ होऊ शकतो. तुमची रखडलेली कामे पुन्हा पूर्ण होण्यास सुरुवात होऊ शकते. करिअरमध्ये प्रमोशन मिळवण्यासाठी तुम्हाला अनेक महत्त्वाच्या कामांची जबाबदारी मिळू शकते, जी तुम्हाला चांगल्या प्रकारे पार पाडावी लागेल, जीवनात सुख-समृद्धी येईल, कामानिमित्त परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. मुलांकडून चांगली बातमी मिळेल.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guru gochar 2024 after 12 months and 8 days jupiter transit guru will enter venus sign these zodiacs will earn a lot of money sjr
First published on: 18-04-2024 at 11:52 IST