Guru Gochar 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, गुरू ग्रह समृद्धी, ज्ञान, ज्योतिष, पूजा- अर्चा आणि शिक्षणाचा कारक ग्रह मानला जातो. गुरू ग्रह सुमारे १३ महिन्यांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करतो. म्हणून गुरू ग्रहाला एक राशिचक्र पूर्ण करण्यासाठी १२ वर्षांचा काळ लागतो. १४ मे रोजी गुरू ग्रह मिथुन राशीत गोचर करील. त्याचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर दिसून येईल. पण, गुरू ग्रहाच्या गोचराचा १२ राशींवर नेमका काय परिणाम होईल ते जाणून घेऊ…

गुरू गोचर ‘या’ राशींसाठी ठरेल शुभ

कन्या, कर्क, तूळ, वृषभ, मकर व मिथुन राशीच्या लोकांसाठी गुरूचे गोचर फायदेशीर ठरू शकते. या काळात लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. या काळात तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. अडकलेले आर्थिक व्यवहार मार्गी लागू शकतात. परदेशात प्रवास करण्याची किंवा परदेशातून लाभ मिळण्याची शक्यता आहे. मानसिक शांती आणि आध्यात्मिक विकासदेखील होऊ शकतो.

या काळात तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. विवाहित जोडप्यांसाठी हा काळ अनुकूल आहे; तर अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. आरोग्य चांगले राहील. व्यावसायिक जीवनात तुम्हाला यश मिळू शकते. नवीन व्यवहारातून नफा होऊ शकतो.. कौटुंबिक जीवनात आनंद व शांती राहील. नातेसंबंध अधिक दृढ होऊ शकतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुरू गोचर या राशींसाठी ठरेल मध्यम फलदायी

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, कुंभ, मीन, धनू व वृश्चिक राशीच्या लोकांसाठी गुरूचा राशिबदल मध्यम फलदायी ठरू शकतो. या काळात तुम्हाला एखाद्या गोष्टीचा ताण जाणवू शकतो; पण हळूहळू तुम्ही तणावातून मुक्त होऊ शकता. तुमचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात; पण या काळात तुम्ही पैसे खूप विचारपूर्वक खर्च केले पाहिजेत. अन्यथा, तुमचे बजेट बिघडू शकते. तुम्हाला भौतिक प्रगती साधता येऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले निकाल लागू शकतात. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.