Guru Transit 2025 in Marathi : ज्योतिष्यशास्त्रामध्ये गुरू ग्रहाचा संबध ज्ञान, वृद्धी, शिक्षक, मुलं, धन, दान आणि पुण्याशी जोडला जातो. त्यामुळे गुरू ग्रहाची चाल बदणार आहे ज्याचा प्रभाव राशींवर होईल. गुरु ग्रह ऑक्टोबरमध्ये कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे. गुरू कर्क राशीमध्ये १२ वर्षांनंतर प्रवेश करणार आहे. अशा स्थितीमध्ये काही राशींच्या लोकांचे नशीब चमकणार आहे. तसेच या राशींना पद-प्रतिष्ठा मिळू शकते. चला जाणून घेऊ या या
तूळ राशी (Cancer Zodiac)
तूळ राशीच्या लोकांसाठी गुरू ग्रहाचे राशी गोचर लाभदायी ठरू शकते. कारण आपल्या राशीमध्ये गुरू ग्रह दहाव्या म्हणजेच कर्म स्थानी गोचर करत आहे. त्यामुळे तुम्हाला नवीन नोकरीची संधी मिळू शकते. तसेच या काळात नोकरदार लोकांची पदोन्नती होऊ शकते. तसेच व्यापारी लोकांना व्यवसायातून चांगला फायदा मिळू शकते. नवीन व्यवसायिक संबध निर्माण होऊ शकतात आणि व्यवसायाची वाढ होऊ शकते. तसेच सरकारी कामात यश आणि पद-प्रतिष्ठा वाढू शकते.
वृश्चिक राशि (Scorpio Zodiac)
गुरू ग्रहाचे गोचर तुम्हा लोकांसाठी फायदेशीर सिद्ध होऊ शकते. कारण तुमच्या गोचर कुंडलीमध्ये गुरू ग्रह नवव्या स्थानी आहे ज्यामुळे भाग्य आणि विदेश यात्राचे स्थान मानले जाते. त्यामुळे या काळात तुम्हाला भाग्याची पूर्ण साथ मिळेल. तसेच अडकलेले काम पूर्ण होईल. तसेच या काळात तुम्ही व्यापाराच्या संबधीत प्रवासही करू शकता जो लाभदायी सिद्ध होऊ शकतो. बचत केलेले पैसे परत मिळू शकतात. परदेश प्रवास किंवा परदेशातून लाभ होण्याचा योग आहे. तसेच मानसित शांती आणि आध्यात्मिक विकास होऊ शकतो. तसेच कोणत्याही धार्मिक किंवा मांगलिक कार्यामध्ये सहभागी झाले आहेत.
कर्क राशि (Cancer Zodiac)
तुम्ही लोकांना गुरू ग्रहाचे राशी परिवर्तन लाभदायी सिद्ध होऊ शकते. कारण गुरू ग्रह आपल्या राशीच्या लग्नस्थानी गोचर करणार आहे. त्यामुळे या काळात तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. तसेच तुम्ही विचार केलेल्या सर्व योजना यशस्वी होऊ शकतो. तसेच तुम्ही या काळात समाजात खूप लोकप्रिय होऊ शकता. तुम्हाला मान सन्मान मिळेल. तसेच अविवाहित लोकांसाठी लग्नाचे स्थळ येईल. तर विवाहित लोकाचे आयुष्य आनंदी असेल. कौंटुबिक जीवनात सुख- शांती निर्माण होईल आणि नात्यामध्ये प्रेम निर्माण होईल.