Guru Gochar 2025: देवगुरु हे नवग्रहांपैकी खूप महत्त्वाचे मानले जातात. ते दर एक वर्षाने आपली रास बदलतात, त्यामुळे त्यांना पुन्हा त्याच राशीत यायला जवळपास १२ वर्ष लागतात. मे महिन्यात गुरु मिथुन राशीत आले होते. त्यानंतर ते अतिचारी गतीने चालू लागले. अतिचारी म्हणजे त्यांच्या गतीत दुप्पट वाढ होणे. त्यामुळे ते ऑक्टोबर महिन्यात कर्क राशीत प्रवेश करतील आणि सुमारे ४९ दिवस तिथे राहून पुन्हा मिथुन राशीत जातील.
गुरु चंद्राच्या राशीत आल्यामुळे १२ राशींच्या जीवनात काही ना काही बदल दिसतील. यापैकी ३ राशींचे नशीब उजळू शकते. चला, तर मग जाणून घेऊया त्या लकी राशी कोणत्या आहेत…
वैदिक ज्योतिषानुसार, १८ ऑक्टोबरला रात्री ९ वाजून ३९ मिनिटांनी गुरु कर्क राशीत जातील आणि ५ डिसेंबरला दुपारी ३ वाजून ३८ मिनिटांनी मिथुन राशीत जातील.
मिथुन राशी (Gemini Horoscope)
या राशीच्या लोकांसाठी गुरुचे कर्क राशीत जाणे फायदेशीर ठरू शकते. गुरु या राशीच्या दुसऱ्या भावात असतील. त्यामुळे या राशीच्या लोकांना अनेक क्षेत्रांत फायदा होऊ शकतो. बराच काळ थांबलेली कामे पूर्ण होतील आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगले संबंध जुळू शकतात. यामुळे पुढच्या काळात तुम्हाला बऱ्यापैकी फायदा होईल. मानसिक तणाव कमी होऊ शकतो. अध्यात्माकडे तुमचा कल वाढू शकतो. त्यामुळे धर्मकामात सक्रियपणे भाग घेऊ शकता. तसेच तुम्ही लांबचा प्रवासही करू शकता, ज्यामुळे तुम्हाला चांगला फायदा मिळू शकतो.
वृश्चिक राशी (Scorpio Horoscope)
या राशीच्या लोकांसाठी गुरुचे कर्क राशीत जाणे फायदेशीर ठरू शकते. या राशीच्या लोकांची बराच काळ थांबलेली एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते. तसेच खूप दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात. कुटुंबासोबत छान वेळ घालवता येईल. मुलांकडून एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. जीवनात सुख-शांती राहील. तसेच तुमची एखाद्या मित्राशी किंवा तुमच्या आवडत्या व्यक्तीशी भेट होऊ शकते. जीवनात आनंदाचे क्षण येऊ शकतात.
मीन राशी (Pisces Horoscope)
या राशीच्या लोकांसाठी गुरुचे कर्क राशीत जाणे फायदेशीर ठरू शकते. या राशीच्या कर्मभावाचे स्वामी गुरु पंचम भावातून जात आहेत. त्यामुळे या राशीच्या लोकांना चांगला फायदा होऊ शकतो. कुटुंबासोबत छान वेळ घालवता येईल. शिक्षणाच्या क्षेत्रातही चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना यश मिळू शकते. मुलांशी संबंधित समस्या संपुष्टात येऊ शकतात. उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. तसेच अपत्यप्राप्तीची इच्छा पूर्ण होऊ शकते. प्रेमसंबंध चांगले राहतील. अविवाहितांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांना नवे अवसर मिळू शकतात आणि पद-प्रतिष्ठाही वाढू शकते.