ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधीनंतर राशी बदल करतो. या संक्रमणाचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. ज्ञान आणि प्रगतीचा कारक असलेला बृहस्पति म्हणजेच गुरु ग्रहाने १२ एप्रिल रोजी स्व-राशी असलेल्या मीन राशीत प्रवेश करत आहे. ज्योतिषशास्त्रात गुरु ग्रहाचा संबंध ज्ञान, प्रगती, शिक्षक, संतती, शिक्षण, संपत्ती, दान आणि पुण्य यांच्याशी आहे. त्यामुळे गुरूचे संक्रमण सर्व राशींवर परिणाम करेल. पण तीन राशी आहेत, ज्यांना या राशी बदलातून चांगले पैसे मिळू शकतात. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या तीन राशी

कोणत्या राशीला कितवा गुरू जाणून घ्या

lucky number by date of birth
पैसा, पद, प्रतिष्ठा तुम्हाला कधी मिळणार? भाग्यांकावरून पाहा तुमचे लकी वर्ष
Loksatta kutuhal Artificial intelligence Technology The Turing Test Mirror test
कुतूहल: स्वजाणिवेच्या पात्रता कसोट्या
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?
Shani Dev Vakri In Kumbh saturn vakri in Aquarius these three zodiac sign big success in life
३० वर्षांनंतर शनिदेवाची कुंभ राशीत वक्री चाल; ‘या’ राशींना येतील सोन्याचे दिवस? मिळू शकेल बक्कळ पैसा
राशीकितवा गुरु
मेषबारावा
वृषभअकरावा
मिथुनदहावा
कर्कनववा
सिंहआठवा
कन्यासातवा
तूळसहावा
वृश्चिकपाचवा
धनूचौथा
मकरतिसरा
कुंभदुसरा
मीनपहिला

वृषभ: गुरू ग्रह तुमच्या राशीतून अकराव्या स्थानात आहे. ज्याला उत्पन्न आणि लाभाचे स्थान म्हणतात. त्यामुळे या काळात तुमचे उत्पन्न चांगले वाढू शकते. यासोबतच उत्पन्नाचे नवीन स्रोतही निर्माण होऊ शकतात. व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. यासोबतच व्यावसायिक करार निश्चित होऊ शकतो. याचा तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकतो. त्याच वेळी, तुमची कार्यशैली देखील सुधारेल आणि तुमच्या कामाची प्रशंसा होईल. त्याच वेळी, नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी वेळ अनुकूल आहे.

मिथुन: गुरु ग्रहाचे संक्रमण तुमच्यासाठी अद्भूत असणार आहे. कारण गुरु हा ग्रह तुमच्या दशम भावात आहे. या स्थानाला नोकरी आणि कार्यक्षेत्राचं स्थान म्हणतात. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. तुम्हाला बढती मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. यासोबतच नवीन व्यावसायिक संबंध निर्माण होऊन व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. मार्केटिंग आणि मीडिया क्षेत्राशी संबंधित असलेल्यांसाठी हा काळ चांगला आहे.

Surya Grahan 2022: शनि अमावास्या आणि सूर्यग्रहण एकाच दिवशी, जाणून घ्या कोणत्या राशींवर होणार परिणाम

कर्क: गुरूचे संक्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण गुरु ग्रह तुमच्या नवव्या भावात भ्रमण करेल. या स्थानाला भाग्य आणि परदेश प्रवासाचे स्थान म्हंटलं जातं. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. यासोबतच रखडलेली कामेही होतील. त्याच वेळी, आपण व्यवसायाच्या संदर्भात प्रवास देखील करू शकता, जे फायदेशीर सिद्ध होऊ शकते. , दुसरीकडे, ज्या लोकांचा व्यवसाय खाद्यपदार्थ, हॉटेल, रेस्टॉरंटशी संबंधित आहे, अशा लोकांना यावेळी विशेष लाभ मिळू शकतो.