Guru Gochar 2025: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते; ज्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव १२ राशींपैकी काही राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात गुरू ग्रहाला ज्ञान, सौभाग्य आणि सुख-समृद्धीचा कारक ग्रह मानले जाते. गुरु सध्या मिथुन राशीत विराजमान असून तो ऑक्टोबरमध्ये कर्क राशीत आणि वर्षाच्या शेवटी पुन्हा मिथुन राशीत प्रवेश करणार आहे.
पंचांगानुसार, गुरू १८ ऑक्टोबर २०२५ रोजी ९ वाजून ३९ मिनिटांनी कर्क राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर गुरू ४ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजून ३९ मिनिटांनी वक्री अवस्थेमध्ये प्रवेश करणार आहे.
गुरूचे राशी परिवर्तन ‘या’ तीन राशींसाठी फायदेशीर
मिथुन (Mithun Rashi)
गुरू ग्रहाच्या राशी परिवर्तनाने मिथुन राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. या काळात समाजात मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा वाढेल. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. धार्मिक स्थानांना भेट द्याल. अध्यात्माविषयी मनात ओढ राहील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. भौतिक सुख प्राप्त होईल.
कन्या (Kanya Rashi)
कन्या राशीच्या व्यक्तींसाठी गुरूचे राशी परिवर्तन खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप अनुकूल असेल. वैवाहिक आयुष्यातील तणाव दूर होईल. कर्ज कमी होण्यास मदत होईल. दूरचे प्रवास घडतील. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळेल.
तूळ (Tula Rashi)
गुरू ग्रहाच्या राशी परिवर्तनाने तूळ राशीच्या व्यक्तींना अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. अचानक धनलाभ होतील, आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे.
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)