Mahakedar Rajyog Gurudev Transit: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीच्या अंतराने गोचर करत असतो. काही वेळा ग्रहांच्या वक्री, मार्गी स्थितीत सुद्धा राशींवर परिणाम दिसून येऊ शकतो. काही ग्रह एकत्र आल्याने दुर्लभ राजयोग सुद्धा तयार होत असतात. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार, येत्या काही दिवसात महाकेदार राजयोग तयार होत आहे. तब्बल २० वर्षांनी दुर्मिळ योग जुळून आला आहे. जेव्हा एखाद्या राशीच्या कुंडलीत चतुर्थ स्थानी सात ग्रह एकत्र येतात तेव्हा यातून महाकेदार राजयोग तयार होत असतो, म्हणूनच हा योग दुर्मिळ मानला जातो. यंदा जेव्हा हा राजयोग निर्माण होणार आहे तेव्हा त्याचा शुभ प्रभाव तीन राशींवर अत्यंत लाभदायक रूपात दिसून येऊ शकतो. या तीन राशींच्या भाग्यात आकस्मिक धनलाभ व भाग्योदयाचे योग तयार होत आहेत.

२० वर्षांनी महाकेदार राजयोग बनल्याने ‘या’ राशी होऊ शकतात कोट्यधीशांच्या मालक

मेष रास (Aries Zodiac)

महाकेदार राजयोग बनल्याने मेष राशीला लाभाचा काळ अनुभवता येऊ शकतो. हा राजयोग आपल्या राशीच्या लग्न भावी तयार होत आहेत, गुरु, चंद्र, राहूची युती व त्यात शनीची वक्र दृष्टी यामुळे मेष राशीला अचानक धनलाभ होण्याची चिन्हे आहेत. असं असलं तरी कामाचा व्याप वाढल्याने तुमचा मानसिक ताण वाढू शकतो. आपल्या राशीच्या दुसऱ्या स्थानी सूर्य व बुध प्रभावाचा बुधादित्य राजयोग तयार होत आहे. याचा प्रभाव आपल्या वाणीवर दिसून येऊ शकतो. तुमच्या व्यक्तिमत्वात होणाऱ्या बदलांमुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होऊ शकतात. तुमच्या राशीच्या चतुर्थ स्थानी सुद्धा शुक्र व मंगळ युतीतून केंद्र त्रिकोण राजयोग तयार होत असल्याने तुम्हाला वाहन व प्रॉपर्टी खरेदीचा योग आहे.

कर्क रास (Cancer Zodiac)

महाकेदार राजयोग कर्क राशीसाठी अत्यंत शुभ सिद्ध होऊ शकतो. तुमच्या राशीच्या ११ व्या स्थानी केंद्र त्रिकोण राजयोग, बुधादित्य, गजकेसरी राजयोग तयार होत आहे. तुम्हाला प्रॉपर्टी खरेदीच्या- विक्रीच्या माध्यमातून प्रचंड धनलाभ होऊ शकतो. जी मंडळी राजकीय क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांना पदोन्नतीचा योग आहे. समाजात तुमची पद व प्रतिष्ठा वाढून एक वेगळ्या जीवनशैलीचा अनुभव घेता येऊ शकतो. फिल्म लाईन व रिअल इस्टेटमध्ये कार्यरत मंडळींना सुद्धा प्रचंड धनलाभाच्या रूपात फायदा होऊ शकतो.

हे ही वाचा<< २४ जूनला बुधदेव मिथुन राशीत गोचर करताच ‘या’ ४ राशी होणार सर्वाधिक श्रीमंत? धनलाभासह सापडू शकते प्रेमाची व्यक्ती

मकर रास (Capricorn Zodiac)

मकर राशीला महाकेदार राजयोग बनल्याने रातोरात श्रीमंती अनुभवता येऊ शकते. तुम्हाला सुख व समाधान देऊ शकतील अशा घटना घडू शकतात. तुम्हाला भौतिक सुख व चैनीच्या वस्तूंची खरेदी करण्याची संधी आहे. कामाच्या ठिकाणी तुमची प्रचंड प्रगती झाल्याने हितशत्रू वाढू शकतात पण तुम्हाला कर्तबगारी सिद्ध करून सर्वांचे तोंड बंद करावे लागू शकते पण तुम्हाला जर हे शक्य झाले तर तुमची प्रगती कोणीच थांबवू शकणार नाही. पदोन्नति व पगारवाढीच्या संधी तुमच्या कुंडलीत दिसून येत आहेत. अडकलेली कामे मार्गी लागू शकतात. तसेच सरकारी योजनांच्या माध्यमातून धनलाभ होऊ शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)