Guru Nakshatra Gochar: वैदिक ज्योतिषानुसार, इतर ग्रहांप्रमाणेच गुरु ग्रहही वेळोवेळी आपली चाल बदलत असतो. ज्योतिषशास्त्राच्या गणनेनुसार, १३ जुलै रोजी गुरुने आर्द्रा नक्षत्राच्या तिसऱ्या चरणात प्रवेश केला होता. पण आता ते आता आर्द्रा नक्षत्राच्या चौथ्या चरणात प्रवेश करणार आहेत.
देवगुरु २८ जुलैला आर्द्रा नक्षत्राच्या चौथ्या चरणात प्रवेश करणार आहेत. ते १२ ऑगस्टपर्यंत या नक्षत्रात राहणार आहेत. त्यानंतर १३ ऑगस्टला ते पुनर्वसू नक्षत्रात प्रवेश करतील.
ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा कुंडलीत गुरु ग्रह मजबूत असतो, तेव्हा व्यक्तीची आर्थिक स्थिती चांगली राहते. तसेच सर्व प्रकारच्या कामांमध्ये यश मिळते. चला तर मग पाहूया की गुरुच्या नक्षत्र बदलामुळे कोणत्या ३ राशींना फायदा होणार आहे.
मिथुन राशी (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी गुरुचा नक्षत्र गोचर नव्या संधी आणि चांगल्या बातम्या घेऊन येऊ शकतो. कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध मजबूत होतील. करिअरविषयक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. जोडीदाराचा पाठिंबा मिळेल. आरोग्याची काळजी घ्या आणि बोलताना संयम राखलेला चांगला ठरेल.
सिंह राशी (Leo Horoscope)
गुरुचा नक्षत्र गोचर सिंह राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. आर्थिक स्थितीत स्थिरता येईल आणि व्यापाऱ्यांसाठी वेळ खूप अनुकूल असेल. व्यवसायात नफा होण्याची शक्यता आहे. घरात शांतता राहील आणि नवीन नोकरीच्या संधीही मिळू शकतात.
धनु राशी (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी गुरुचा नक्षत्र गोचर खूप शुभ ठरू शकतो. या काळात जीवनातील अडचणी हळूहळू कमी होऊ लागतील. नोकरी करणाऱ्यांना यश आणि सन्मान मिळेल, तसेच मित्रांचा पाठिंबाही मिळेल. करिअरमध्ये स्थिरता आणि शांतता राहील आणि नशिबाचाही पूर्ण साथ मिळेल.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)