Guru Grah Margi 2022: ज्योतिषशास्त्रात ‘गजकेसरी योग’ अत्यंत शुभ मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत हा योग असतो तो आर्थिकदृष्ट्या सक्षम असतो. या योगामुळे त्या व्यक्तीकडे कधीही पैशांची कमतरता भासत नाही. समाजात अशा व्यक्तींची एक वेगळी ओळख निर्माण होते. यासोबतच त्याला सर्व भौतिक सुखे मिळतात. २४ नोव्हेंबरला गुरु ग्रह मार्गी होणार आहे. त्यामुळे ‘गजकेसरी राजयोग’ तयार होईल. या योगाचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल. पण अशा ३ राशी आहेत, ज्यांना हा योग तयार झाल्याने चांगले आर्थिक लाभ आणि करिअरमध्ये यश मिळू शकते. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या राशी…

मेष राशी

गजकेसरी योग तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकतो. कारण हा योग तुमच्या राशीतून बाराव्या घरात तयार होईल. जे नुकसान आणि प्रवासाचे ठिकाण मानले जाते. त्यामुळे यावेळी तुम्ही अनावश्यक खर्चापासून वाचू शकता. तसेच, यावेळी तुम्ही अनेक गोष्टीतून बचत कराल. ज्यांना यावेळी नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांच्यासाठी हा काळ योग्य आहे. त्याचबरोबर तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. तसेच, तुम्ही व्यवसायाच्या संदर्भात प्रवास करू शकता.

( हे ही वाचा: ‘लक्ष्मी नारायण राजयोग’ तयार झाल्याने ‘या’ ३ राशींचे नशीब अचानक पालटणार, २०२३ वर्ष घेऊन येईल प्रचंड धनलाभाची संधी)

वृश्चिक राशी

गजकेसरी योग तुमच्यासाठी करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने शुभ सिद्ध होऊ शकतो. कारण हा योग तुमच्या राशीतून पाचव्या घरात तयार होणार आहे. त्यामुळे यावेळी तुम्हाला बक्कळ धनलाभ होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला जुने रखडलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आर्थिक बाबतीतही लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला त्यात यश मिळण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तूळ राशी

तूळ राशीच्या लोकांना गजकेसरी राजयोग तयार झाल्यामुळे शत्रूंवर विजय मिळू शकतो. यासोबतच जुनाट आजार असल्यास त्यापासून मुक्ती मिळण्याची शक्यता आहे. तसच जे अविवाहित आहेत, त्यांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो किंवा नाते निश्चित होऊ शकते. यावेळी तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी सहकार्य मिळू शकते आणि तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते. तसेच कुटुंबात काही शुभ आणि धार्मिक कार्यक्रम होऊ शकतो.