24th October 2024 Horoscopes In Marathi : आज २४ ऑक्टोबर २०२४ रोजी अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी आहे. अष्टमी तिथी दुपारी १ वाजून ५९ मिनिटांपर्यंत राहील. तसेच ५ वाजून २२ मिनिटांपर्यंत साध्ययोग राहील. पुष्य नक्षत्र सकाळी ७ वाजून ४० मिनिटांपर्यंत जागृत असेल. आज राहू काळ १ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते ३ वाजेपर्यंत असेल.

आज अहोई अष्टमी व्रत पाळण्यात येणार आहे. तसेच आजच्या दिवशी गुरुपुष्यामृत योग एकत्र जुळून आला आहे.या गुरुपुष्यामृत योगाचे फार महत्त्व आहे. या दिवशी हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदेवतेची मनोभावे पूजा करणे शुभ फलदायक असते. याशिवाय आज श्री राधाष्टमी साजरी करण्याची परंपरा आहे.तर आजचा शुभ दिवस मेष ते मीनपैकी कोणासाठी सुवर्णकाळ घेऊन येणार आहे जाणून घेऊयात…

२४ ऑक्टोबर पंचांग व राशीभविष्य (Aries To Pisces Daily Astro ) :

मेष:- त्रासदायक गोष्टींपासून दूर रहा. राग अनावर होऊ शकतो. मन अस्थिर राहील. अनावश्यक खर्च टाळावा. दिवसाची सुरुवात दमदार होईल.

वृषभ:- अनेक बाजूंनी लाभदायक दिवस. कष्टाचे फळ मिळेल. तुमचा आनंद द्विगुणित होईल. संयम सोडून वागू नका. जुन्या मित्रांची गाठ पडेल.

मिथुन:- कामाचा भार वाढेल. त्यामुळे थकवा जाणवेल. कष्टाचे फळ थोड्या अवधीने मिळेल. अनावश्यक खर्च वाढू शकतो. आनंदी वृत्ती ठेवावी.

कर्क:- भाग्याची उत्तम साथ मिळेल. कमी नवीन कामे अंगावर पडतील. उत्साह कमी पडू देऊ नका. नातेवाईक मदतीला येतील. नवीन विचार जाणून घेता येतील.

सिंह:- चिडचिड वाढू शकते. शांततेचे धोरण ठेवावे. अधिकाराचा योग्य वेळी वापर करावा. प्रवासात काळजी घ्यावी. हातापायाला किरकोळ जखम संभवते.

कन्या:- जोडीदारासाठी वेळ काढावा लागेल. स्वभावात उधळेपणा येईल. वस्तूंची गरज लक्षात घेऊन खरेदी करावी. चोरांपासून सावध राहावे. उगाचच कोणाचा राग मनात धरून ठेऊ नका.

तूळ:- तब्येतीच्या किरकोळ तक्रारी जाणवतील. जवळच्या व्यक्तीशी मनमोकळे बोलावे. फार त्रास करून घेऊ नका. समतोल साधण्याचा प्रयत्न करावा. चिडचिड करू नका.

वृश्चिक:- स्त्रीवर्गापासून सावध राहावे. पायाचे त्रास जाणवतील. डोळ्यांची वेळेवर तपासणी करावी. पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्यावी. मुलांची उत्तम साथ मिळेल.

धनू:- उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. कामात जोडीदाराची मदत घ्याल. मुलांच्या मनात आदर निर्माण होईल. संतती सौख्य उत्तम लाभेल. हाताखालील लोकांशी नीट वागावे.

मकर:- योजनेला मूर्त स्वरूप द्यावे. हातातील कामात चिकाटी ठेवा. आळस झटकून काम करावे लागेल. वडीलधार्‍यांची सेवा कराल. मोठ्यांचा आशीर्वाद लाभेल.

कुंभ:- घर आणि काम यांचा मेल घालावा. नातेवाईकांना नाराज करू नका. तुमच्यातील हुशारी दिसून येईल. कुटुंबात मन रमेल. प्रवास त्रासदायक ठरू शकतात.

मीन:- खर्चाला आवर घालावी. कामानिमित्त घरापासून दूर राहावे लागेल. मनात उगाचच भलत्या शंका आणू नका. हातातील कामाला प्राधान्य द्यावे. ध्यानधारणा करावी.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर