Guru Uday 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गुरू ग्रहाला ज्ञान, संपत्ती, संतती, विवाह आणि भाग्याचा कारक ग्रह मानले जाते. त्यात गुरूचा ९ जुलै २०२५ रोजी मिथुन राशीत उदय होणार आहे. १८ ऑक्टोबरपर्यंत तो याच अवस्थेत राहील. नंतर तो कर्क राशीत प्रवेश करेल. पण, मिथुन राशीत गुरूचा उदय होताच काही राशींच्या लोकांच्या नशिबाला श्रीमंतीची कलाटणी मिळू शकते. त्यांना प्रत्येक कार्यात यश मिळू शकते. विशेषत: १२ पैकी तीन राशींना भरपूर लाभ मिळू शकतो. पण, या तीन भाग्यशाली राशी कोणत्या ते जाणून घेऊ…

मकर (Capricorn Zodiac Sign)

गुरूचा उदय मकर राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरू शकतो. या राशीच्या लोकांना अनेक क्षेत्रांत प्रचंड यश मिळू शकते. जीवनात येणाऱ्या आव्हानांपासून त्यांना मुक्ती मिळेल. जे लोक नवीन नोकरी मिळविण्यासाठी कठोर मेहनत घेत आहेत, त्यांना भरपूर यश मिळू शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना विशेष फायदा होऊ शकतो. या काळात नवीन व्यवसाय सुरू करणे फायदेशीर ठरू शकते. आरोग्यही चांगले राहणार आहे. तुम्ही नको तिथे पैसा खर्च करणार नाही. उत्पन्न वाढवण्यासाठी तुमचे कार्यक्षेत्र मजबूत कराल. नोकरीच्या ठिकाणी सकारात्मक बदल दिसू शकतात. तुम्ही परदेशात व्यवसाय वा नोकरीनिमित्त्त जाऊ शकता आणि तिथेच राहू शकता. तुम्हाला संपत्ती जमा करण्यात यश मिळेल.

धनू (Sagittarius Zodiac Sign)

गुरू ग्रहाचा उदय धनू राशीच्या लोकांसाठी अनेक क्षेत्रांमध्ये अनुकूल परिणाम दाखविणारा ठरू शकतो. या राशीच्या लोकांमधील सर्जनशीलता आणि ज्ञान वाढू शकते. तुमचे दीर्घकाळ प्रलंबित असलेले काम पूर्ण होऊ शकते, तसेच संपत्तीत वाढ होऊ शकते. तुमच्या कामातील अडथळे दूर होऊ शकतात. लग्न करण्यास इच्छुक असलेल्या लोकांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण असेल. कुटुंबात सुरू असलेला कलह संपू शकतो. भागीदारीत कोणताही व्यवसाय करत असाल, तर तुमच्या लोकांमधील गैरसमज आता संपू शकतात. तुम्हाला मुलाकडून काही चांगली बातमी मिळू शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुंभ (Aquarius Zodiac Sign)

देवगुरू गुरू ग्रहाचा उदय कुंभ राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरू शकतो. या राशीच्या लोकांना शिक्षण क्षेत्रात खूप फायदा होऊ शकतो. आर्थिक गुंतवणुकीतून तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता. नोकरदारांना या काळात फायदा होऊ शकतो. जे लोक लग्नास इच्छुक आहेत, त्यांना मागणी येऊ शकते. कौटुंबिक व्यवसायात चांगला नफा होऊ शकतो. तुमचा अध्यात्माकडे कल असेल. अशा परिस्थितीत तुम्ही धार्मिक बाबींमध्ये मोठ्या उत्साहाने भाग घ्याल. वडील आणि वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळू शकते, ज्यामुळे तुम्ही तुमचे ध्येय साध्य करू शकता.