Guru Uday 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा जेव्हा एखाद्या ग्रहाचा उदय किंवा अस्त होतो, तेव्हा त्याचा परिणाम प्रत्येक राशीवर होतो. जुलैमध्ये गुरु ग्रहाचा मिथुन राशीत उदय होणार आहे. त्याचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर दिसून येईल. परंतु, १२ पैकी अशा तीन राशी आहेत, ज्यांना या काळात चांगली आर्थिक प्रगती साधता येऊ शकते. चला जाणून घेऊया या भाग्यवान राशींविषयी ….

मिथुन

गुरु ग्रहाचा उदय मिथुन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. तुमच्या जोडीदाराच्या मदतीने तुमच्या संपत्तीत वाढ होऊ शकते. जोडीदाराच्या मदतीने घेतलेले निर्णय तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. व्यावसायिकांना चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो. जीवनशैलीत सकारात्मक बदल होतील. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा राहील. आर्थिक योजना यशस्वी होतील आणि कलात्मक क्षेत्रात प्रसिद्धी आणि आदर मिळेल.

वृषभ

गुरु ग्रहाचा उदय वृषभ राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतो. या काळात तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. त्याच वेळी, व्यावसायिकांना त्यांनी दिलेले पैसे परत मिळू शकतात. तुम्हाला पैसे बचत आणि गुंतवण्यातही यश मिळेल. तसेच आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे, तुमच्या कामाचे कौतुक होईल. व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळेल. नवीन व्यावसायिक संबंध प्रस्थापित होतील.

कन्या

गुरु ग्रहाचा उदय कन्या राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकतो. या काळात तुम्हाला कामात आणि व्यवसायात प्रगती साधता येऊ शकते. त्याचवेळी बेरोजगारांना नवीन नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. जीवनात सुख- सुविधांमध्ये वाढ होऊ शकते. कामाच्या ठिकाणी आदर आणि पदोन्नतीच्या संधी मिळतील. नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्यासाठी हा शुभ काळ आहे. आर्थिक परिस्थितीत मोठी सुधारणा होण्याची शक्यता आहे.