Guru Uday 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह एका ठराविक कालावधीनंतर अस्त आणि उदय होतात, ज्याचा थेट परिणाम व्यक्तीच्या जीवनावर आणि देश जगावर दिसून येतो. गुरू ग्रह जुलै महिन्यात मिथुन राशीमध्ये उदय होणार आहे ज्याचा थेट प्रभाव सर्व राशींच्या लोकांवर दिसून येईस. पण तीन अशा राशी आहेत, ज्यांचे नशीब चमकू शकते. तसेच या लोकांना पद प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकते. अडकलेले धन परत मिळू शकते. जाणून घेऊ या त्या नशीबवान राशी कोणत्या आहेत.
मिथुन राशी (Mithun Zodiac)
या लोकांसाठी गुरूचा उदय होणे फायद्याचे ठरू शकते. कारण गुरू ग्रह या राशीच्या लग्न स्थानावर उदय होणार आहे. त्यामुळे या वेळी या लोकांचा आत्मविश्वासात वृद्धी होऊ शकते. त्याबरोबर नोकरी करणाऱ्यांचे सहकाऱ्यांबरोबर संबंध चांगले राहीन. करिअरमध्ये प्रगती होण्याची चांगली संधी मिळू शकते. तसेच या वेळी या लोकांनी ठरवलेली योजना यशस्वी होऊ शकते. तसेच काही समस्या दूर होतील. विवाहाशी संबंधित बाबींना वेग मिळेल. जर वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतील.
तुला राशी (Tula Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी गुरूचा उदय होणे लाभदायक ठरू शकतो. कारण गुरू ग्रह या राशीच्या गोचर कुंडलीतून भाग्य स्थानावर उदित होणार आहे. त्यामुळे या दरम्यान या लोकांना नशीबाची साथ मिळू शकते. तसेच अडकलेले कार्य पून्हा बनू शकतात. जर तुम्ही कोणत्या धार्मिक स्थळी जायचा विचार करत असाल तर तुमचा प्लॅन यशस्वी होऊ शकतो. या लोकांना मुलांशी संबंधित प्रकरणामध्ये चांगले परिणाम मिळू शकतात. हे लोक सर्व प्रकरणांमध्ये चांगले करताना दिसून येईल. तसेच या वेळी हे लोक देश विदेशात प्रवास करू शकतात.
सिंह राशी (Leo Zodiac)
गुरू ग्रहाचे उदित होणे या राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरू शकते. कारण गुरू ग्रह सिंह राशीच्या गोचर कुडंलीमध्ये ११ व्या स्थानावर उदित होणार आहे. त्यामुळे या दरम्यान यांच्या कमाईमध्ये चांगला फायदा होऊ शकतो. तसेच नवनवीन स्त्रोत बनू शकतात. तसेय या दरम्यान कौटुंबिक सुख प्राप्त होऊ शकते.येत्या श्रावण महिन्यात नशीबाचा दरवाजा उघडेल. नोकरीमध्ये प्रमोशन मिळू शकते. आणि कौटुंबिक जीवनात तणाव कमी होईल.व्यवसाय करणाऱ्या लोकांना मोठी डिल मिळू शकते. ज्यामुळे भविष्यात लाभ मिळू शकतो. या लोकांना व्यवसायात चांगला नफा मिळेल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)