Guru Uday 2025 Impact in Marathi: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या ग्रहाचा जेव्हा उदय होतो किंवा अस्त होतो तेव्हा त्याचा प्रभाव सर्व राशींवर पडतो. जुलै महिन्यात ग्रह गोचरासह ग्रहांचे उदय सुद्धा होणार आहेत. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, देवगुरु बृहस्पती हे संतान, जीवनसाथी, धन, संपत्ती, मार्गदर्शक, प्रशासक, शिक्षण, ज्योतिष, धर्म, उच्च पद इत्यादींचा कारक मानले गेले आहेत. ज्योतिषशास्त्रात गुरु ग्रहाचे विशेष महत्त्व आहे. म्हणूनच जेव्हा जेव्हा गुरू ग्रह त्यांच्या हालचाली बदलतात तेव्हा त्याचा परिणाम मानवी जीवनावर होतो. गुरु ग्रह जुलैमध्ये उदयास येत आहेत. गुरु ९ जुलै रोजी मिथुन राशीत उदय पावणार आहेत. त्यामुळे पुढल्या महिन्यापासून काही राशींच्या मंडळींना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. या तीन भाग्यवान राशी कोणत्या व त्यांना कोणत्या रूपात लाभ होऊ शकतो हे पाहूया…
गुरुचा मिथुन राशीत उदय, ‘या’ राशींसाठी अच्छे दिन!
मिथुन (Gemini)
मिथुन राशीच्या लोकांसाठी गुरुचा उदय अत्यंत लाभदायक ठरू शकतो. लग्नस्थानी गुरुची उपस्थिती असल्याने नोकरीत येणाऱ्या अडचणी दूर होऊ शकतात. बेरोजगारांना नोकरी मिळण्याची प्रबळ शक्यता आहे. तुम्ही पैसे कमवण्यासोबतच बचत करण्यात यशस्वी होऊ शकणार आहात. विवाहात येणाऱ्या अडथळ्यांचा अंत होऊ शकतो. तुम्हाला अनेक क्षेत्रातून भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात शांतता नांदेल.
धनु (Sagittarius)
गुरुच्या उदयानंतर हा काळ धनुराशीसाठी विशेष फलदायी ठरु शकतो. लाभस्थान, पराक्रम भाव आणि लग्नावर गुरुची दृष्टि असल्याने करिअर, व्यवसायात मोठा फायदा होऊ शकतो. बेरोजगार लोकांना नोकरीच्या संधी मिळू शकतात. तुम्हाला अनेक नवीन ऑर्डर मिळू शकतात. धार्मिक यात्रांचा योग संभवतो. यावेळी अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. यासोबतच आईच्या तब्येतीतही सुधारणा होण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्या सुखसोयींमध्ये वाढ होऊ शकते.
कुंभ (Aquarius)
कुंभ राशीच्या लोकांसाठी गुरुचा पंचम भावातील उदय अत्यंत शुभ फलदायक ठरू शकतो. नोकरी आणि व्यवसायात मोठा फायदा, प्रमोशनची संधी, आणि वेतन वाढ होण्याची शक्यता आहे. तुमची रखडलेली सर्व कामं पुन्हा एकदा सुरू होऊ शकतात. विद्यार्थ्यांना शिक्षणात उत्तम यश मिळू शकतो. उधार गेलेले पैसे परत मिळू शकतात. कौटुंबिक वाद मिटू शकतात. कोर्टाच्या प्रकरणात लाभ मिळू शकेल. यावेळी तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)