ज्योतिष्यशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक वेळेच्या अंतराने राशी बदलतो. या संक्रमणाचा परिणाम पूर्णपणे मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर होत असून हे संक्रमण काहींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ असते, असे मानले जाते. आता तब्बल बारा वर्षांनंतर देवगुरू बृहस्पति ०४ सप्टेंबर २०२३ रोजी वक्री होणार आहेत.

४ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ०४.५८ वाजताच्या दरम्यान देवगुरू बृहस्पति चाल बदलण्यास सुरुवात करतील. ग्रहाच्या या बदलाचा प्रभाव सर्व राशींच्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक स्वरूपात दिसून येईल. पण काही राशी अशा आहेत, या राशींच्या लोकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव दिसून येऊ शकतो. चला तर पाहूया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

‘या’ राशींच्या लोकांवर असेल देवगुरूची कृपा

मेष

ज्योतिषशास्त्रानुसार, बृहस्पति परिवर्तनामुळे मेष राशीच्या लोकांना विशेष लाभ होऊ शकतो. या राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला जाऊ शकतो. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचारही करू शकता. व्यवसायात लाभ होऊ शकतो. करिअरमध्ये केलेल्या मेहनतीचे चांगले फळही मिळू शकते. 

सिंह

सिंह राशीच्या लोकांना बृहस्पति परिवर्तनाचा विशेष फायदा होऊ शकतो. आर्थिक लाभाचे योग तयार होताना दिसत आहेत. या राशींच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. नशीबही साथ देऊ शकतो. कामाच्या ठिकाणीही वेळ तुमच्यासाठी अनुकूल असू शकतो.

(हे ही वाचा: २०० वर्षानंतर रक्षाबंधनाला घडणार अत्यंत शुभ योग, ‘या’ राशी होणार लखपती? शनिदेवाच्या कृपेने मिळू शकतो पैसा )

तूळ

बृहस्पति परिवर्तनामुळे तूळ राशींच्या लोकांसाठी लाभदायी ठरु शकते. या राशींच्या लोकांच्या करिअरमध्ये मोठी प्रगती होऊ शकते आणि तुमच्यासमोर नवीन संधीही येऊ शकतात. व्यवसायाशी संबंधित व्यक्तींना अनुकूल परिणाम मिळू शकतात.

मीन

या राशीचा शासक ग्रह स्वतः गुरू आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप चांगला ठरु शकतो. या काळात या राशीच्या लोकांना कर्जापासून मुक्ती मिळू शकते. पदोन्नती किंवा करिअरमध्ये महत्त्वपूर्ण यश मिळू शकते. या राशींच्या लोकांना नोकरीशी संबंधित उत्कृष्ट परिणाम आणि कामाच्या ठिकाणी संधी मिळू शकतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)