Guru Vakri 2025: २०२५मध्ये गुरू ग्रह कर्क राशीत भ्रमण करत आहे. आता ११ नोव्हेंबर २०२५ रोजी तो वक्री होईल. कर्क राशीत गुरूची वक्री चाल काही राशींसाठी अत्यंत शुभ असेल, मात्र तीन राशींसाठी ती आव्हानात्मक ठरू शकते. या व्यक्तींना त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात अडचणी येऊ शकतात.

२५ दिवस सतर्क रहा

येणाऱ्या काळात गुरूच्या स्थितीत खूप जलद गतीने बदल होतील. ११ नोव्हेंबरपासून वक्री असलेला गुरू ५ डिसेंबर २०२५ पर्यंत उलट दिशेने जाईल. त्यानंतर गुरूवक्री गतीने मिथुन राशीत प्रवेश करेल आणि जून २०२६ पर्यंत तिथेच राहील. दरम्यान, ११ मार्च २०२५ रोजी गुरू थेट असेल. असं असतानाही ११ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२५ पर्यंत कर्क राशीत गुरूची वक्री गती तीन राशींसाठी अशुभ परिणाम करणारी ठरू शकते.

मिथुन राशी

मिथुन राशीसाठी गुरूची वक्री गती त्रासदायक असू शकते. तुमच्या कारकि‍र्दीत तुम्हाला आव्हाने आणि दबाव येऊ शकतो. अनावश्यक खर्च तुमचे बजेट बिघडवतील. अचानक मोठा खर्च येऊ शकतो.

तूळ राशी

तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ अशुभ आहे. त्यांना आर्थिक बाबी आणि करिअरमध्ये सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. तसंच या काळात आत्मपरीक्षण करा आणि तुमच्या चुका ओळखा आणि त्या दुरूस्त करा.

कुंभ राशी

कुंभ राशीच्या लोकांना अनपेक्षित खर्चाचा सामना करावा लागू शकतो. त्यांना अशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो, ज्यांची त्यांनी कधीही कल्पना केली नसेल. या काळात मंदिरात जाऊन देवाचा आश्रय घ्या. कोणतेही चुकीचे काम होणार नाही याची काळजी घ्या.

(टिप:वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)