Hanuman Favourite People: अंकशास्त्रामध्ये अंकाला विशेष महत्त्व आहे. अंकशास्त्रामध्ये १ ते ९ मूलांकविषयी माहिती दिली आहे. प्रत्येक मूलांकवरून आपण व्यक्तीच्या स्वभावाविषयी आणि व्यक्तिमत्वाविषयी जाणून घेऊ शकतो. आज आपण हनुमानाच्या प्रिय मूलांकविषयी जाणून घेणार आहोत. अंकशास्त्रानुसार हनुमानाचा प्रिय मूलांक ९ आहे. ९ अंकाचा स्वामी ग्रह मंगळ आहे. मंगळ ग्रहाचा संबंध हनुमानाशी आहे. मंगळचा देवता हनुमान आहे. ज्या लोकांचा जन्म ९, १८, २७ या तारखेला होतो. त्यांच्यावर नेहमी हनुमानाची कृपा दिसून येते. तसेच या लोकांवर नेहमी हनुमानाचा आशीर्वाद असतो.

ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ९, १८ आणि २७ तारखेला होतो, त्याचा मूलांक ९ असतो. उदा. १ + ९ = ९, २ + ७ = ९. या तीन तारखेला जन्मलेले लोक अत्यंत भाग्यवान असतात. तसेच या मूलांकचे लोक अत्यंक शक्तिशाली आणि निडर स्वभावाचे असतात. जर तुमचा मूलांक ९ असतो किंवा ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ९, १८ आणि २७ तारखेला होतो त्यांनी दर मंगळवारी हनुमानाची आराधना करावी, असे मानले जाते. या दिवशी मोठ्या निष्ठेने हनुमानाची पूजा केल्याने या लोकांना शुभ फळ मिळू शकते.  हनुमानाच्या कृपेने या लोकांचे सर्व स्वप्न पूर्ण होईल. मोठा आर्थिक लाभ दिसून येईल. या लोकांचे आरोग्य उत्तम राहीन. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला नफा मिळू शकतो.

मूलांक ९ असलेल्या लोकांना कधीही कोणत्याही व्यक्तीची भीती वाटत नाही. हे लोक अत्यंत धाडसी स्वभावाचे असतात. ते कोणतेही काम खूप मनापासून आणि मेहनतीने करतात आणि चांगल्या पदावर कार्य करतात. ९ मूलांक असलेल्या लोकांवर नेहमी मंगळ ग्रहाचा प्रभाव दिसून येतो.
ज्योतिषशास्त्रानुसार, जर तुम्हाला हनुमानाची कृपा प्राप्त करायची असेल तर मंगळवार आणि शनिवार या दोन दिवशी नियमित हनुमान चालीसा वाचावी. हनुमानाची पूजा नियमित संपूर्ण शिस्तीने करावी.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)