scorecardresearch

Hanuman Jayanti 2022: हनुमान जयंतीचा शुभ मुहूर्त, पूजा विधी जाणून घ्या

हिंदू धार्मिक शास्त्रानुसार रामभक्त हनुमानाचा जन्म चैत्र शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी झाला होता. हनुमान जयंती यंदा १६ एप्रिल २०२२ रोजी आहे.

hanuman-jayanti
Hanuman Jayanti 2022: हनुमान जयंतीचा शुभ मुहूर्त, पूजा विधी जाणून घ्या

हिंदू धार्मिक शास्त्रानुसार रामभक्त हनुमानाचा जन्म चैत्र शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी झाला होता. हनुमान जयंती यंदा १६ एप्रिल २०२२ रोजी आहे. या दिवशी बजरंगबलीची विधीपूर्वक पूजा केली जाते. यावेळी हनुमान जयंतीच्या दिवशी पूजेचा विशेष योगही तयार होत आहे. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. हनुमानजींना संकट मोचन, अंजनी सूत, पवनपुत्र इत्यादी नावांनी देखील ओळखले जाते. असे मानले जाते की या दिवशी हनुमानाची पूजा केल्याने शत्रूंवर विजय प्राप्त होतो आणि आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळते.

हनुमान जयंतीचा शुभ मुहूर्त
वैदिक पंचांगानुसार चैत्र महिन्याची पौर्णिमा शनिवार, १६ एप्रिल रोजी रात्री ०२.२४ पासून सुरू होईल आणि रविवार १७ एप्रिल रोजी दुपारी १२.२३ वाजता समाप्त होईल. या दिवशी हस्त आणि चित्रा नक्षत्र असतील. हनुमान जयंतीला पहाटे ५.५६ ते ०८.३९ या वेळेत रवि योग देखील असेल. रवियोगात देवाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार रवि योगात उपासनेचे फळ दुप्पट मिळते.

हनुमान जयंती पूजा विधी
हनुमान जयंतीच्या दिवशी अनेक लोक उपवास करतात. तसेच काही नियम पाळावे लागतात. या दिवशी भाविक हनुमान मंदिरात दर्शनासाठी जातात. या दिवशी हनुमानाच्या मूर्तीवर जानवं घातलं जातो आणि त्यांच्या मूर्तीवर सिंदूर अर्पण केलं जातं. संध्याकाळी दक्षिणमुखी हनुमानाच्या मूर्तीसमोर हनुमानजींच्या चमत्कारी मंत्रांचा जप फलदायी मानला जातो. या दिवशी रामचरितमानसातील हनुमान चालिसा आणि सुंदरकांड ग्रंथाचे पठण केले जाते. हनुमानजींची आरती करून पूजा विधी पूर्ण करा. पूजेत ओम मंगलमूर्ती हनुमंते नमः या मंत्राचा जप करायला विसरू नका.

Trigrahi Yog: मेष राशीत त्रिग्रही योग, तीन राशींसाठी शुभ काळ

हनुमान जन्मकथा
पौराणिक कथेनुसार, जेव्हा अयोध्येचा राजा दशरथ याने पुत्रेष्टी हवन केले तेव्हा त्याने आपल्या तीन राण्यांना प्रसादाच्या रूपात खीर खाऊ घातली. त्या खीरचा एक भाग कावळ्या घेऊन उडून गेला आणि माता अंजना शिव तपश्चर्येत लीन झालेल्या ठिकाणी पोहोचला. आई अंजनीला खीर मिळाल्यावर तिने ती खीर शिवाचा प्रसाद म्हणून ग्रहण केली. या घटनेत भगवान शिव आणि पवन देव यांचा हातभार लावला. तो प्रसाद खाल्ल्यानंतर हनुमानजींचा जन्म झाला. हनुमानजींना भगवान शंकराचे ११वे रुद्रावतार मानले जातात. हनुमानजींना माता अंजनीमुळे अंजनेय, वडील वानरराज केसरींमुळे केसरीनंदन आणि पवनदेवाच्या सहकार्यामुळे पवनपुत्र, बजरंगबली, हनुमान इत्यादी नावानेही ओळखले जाते.

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Hanuman jayanti 2022 pooja vidhi and muhurt rmt

ताज्या बातम्या