Hartalika Vrat Importance: हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरतालिकेचे व्रत केले जाते. महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांमध्ये हे व्रत विवाहित महिला पतीच्या कल्याण व दीर्घायुष्यासाठी आणि कुमारिका उत्तम वर मिळावा यासाठी करतात. असे म्हणतात की, या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवाला प्राप्त करण्यासाठी केली होती. यंदा २६ ऑगस्ट २०२५ रोजी हे व्रत साजरे केले जाईल.

विवाहेच्छुक मुलींनी का करावे हरतालिकेचे व्रत?

विवाहेच्छुक मुलींनी हरतालिकेचे व्रत करण्यामागे अनेक पौराणिक कथा आहेत.
खरं तर, हरतालिकेच्या दिवशी विवाहित स्त्रिया अखंड सौभाग्याच्या इच्छेने व्रत आणि पूजा करतात. त्याशिवाय विवाहेच्छुक मुली चांगल्या वराच्या प्राप्तीसाठीही हे व्रत करतात. हिंदू धर्मात विवाहित महिलांसाठी हरतालिकेचे विशेष महत्व आहे. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. हरतालिकेच्या व्रतामध्ये भगवान शिव आणि माता पार्वतीची विशेष पूजा केली जाते. हरतालिका व्रत अविवाहित आणि विवाहित स्त्रिया दोघेही करू शकतात.

वटसावित्रीच्या व्रताप्रमाणेच हरतालिकेचे व्रत पूर्वी निर्जल ठेवले जायचे. परंतु, अलीकडच्या काळात हे व्रत फलाहार किंवा उपवासाचे पदार्थ खाऊन केले जाते. पौराणिक मान्यतेनुसार हरतालिकेचे व्रत केल्याने महिलांना वैवाहिक सुख मिळते, अशीही मान्यता आहे.

व्रतासह केली जाते हरतालिकेची पूजा

या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून, स्वच्छ वस्त्र परिधान केले जाते. घर स्वच्छ करून घरातील देवघरातील देवांची पूजा केली जाते. त्यानंतर हरतालिकेच्या मूर्तीची आणि शिवलिंगाचीदेखील पूजा केली जाते. तसेच हरितालिकेच्या कथेचे पठण केले जाते. त्यासह जर तुम्ही विवाहयोग्य असाल आणि अनेक कारणांमुळे तुमचा विवाह होण्यास अडथळे येत असतील, तर देवी पार्वतीचे आणखी एक स्तोत्र खूप प्रभावी मानले जाते, असं म्हणतात. या स्तोत्राच्या नियमित पठणाने अविवाहितांना सुयोग्य जोडीदार प्राप्त होतो, तसेच विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखमय राहते.

देवी पार्वतीचे प्रभावी स्तोत्र

उत्तम जोडीदार मिळावा, यासाठी नियमित देवी पार्वतीच्या ‘पार्वती पंचक’ स्तोत्राचे पठण करावे. हे स्तोत्र अत्यंत प्रभावी असून, त्यामुळे मनातील इच्छा लवकर पूर्ण होते. या स्तोत्राच्या नियमित पठणाने केवळ विवाहच नाही, तर आयुष्यात सुख, शांतीदेखील प्राप्त होते.

पार्वती पंचक स्तोत्राचे पठण कसे करावे?

धार्मिक ग्रंथानुसार सकाळी किंवा संध्याकाळी पार्वती पचंक स्तोत्र पठण करणे उत्तम मानले जाते. सकाळी लवकर उठून अंघोळ करून, स्वच्छ वस्त्र परिधान करावे. घरातील स्वच्छ ठिकाणी बसून समोर धूप, दीप लावून या स्तोत्राचे पठण करावे. ते पठण करताना कोणताही वाईट, नकारात्मक विचार मनात आणू नये. यावेळी मन एकाग्र करावे. पठण झाल्यानंतर देवी पार्वतीला नैवेद्य अर्पण करावा

पार्वती पंचक स्तोत्र ।।

घरधरेन्द्र नन्दिनी शशांक माली संगिनी, सुरेश शक्ति वृद्धिनी नितान्तकान्त कामिनी।

निशा चरेन्द्र मर्दिनी त्रिशूल शूल धारिणी, मनोविथा विदारिणी शिव तनोतु पार्वती।

भुजंग तलप शमिनी महोग्राकांत भागिनी, प्रकाश पुंज दायिनी विचित्र चित्र कारिणी।

प्रचण्ड शत्रु दर्षिणी दया प्रवाह वर्षिणी, सदा सौभाग्य दायिनी शिव तनोतु पार्वती। ।।

प्रकृष्ट रचना कारिका प्रचंड नृत्य नर्तिका, पनक पाणिधारिका गिरीश ऋग मशरिका।

समस्त भक्त दीपावली वर्षिका, कुभाग्य लिंग मर्जिका शिव तनोतु पार्वती।

आचार्य कुमारिका जगत्परा प्रहेलिका, अखंड तप साधिका सुधा सरित्प्रवाहिका।

प्रयत्न पक्ष पौसिका सदार्धि भाव तोषिका, शनि ग्रहादि मांगिका शिव तनोतु पार्वती।

शुभंकारी शिवांकरी विभाकरी निशाचरी, नभश्चरी धराचारी सर्व सृष्टि संचारी।

तमोहरी मनोहरी मृगांक माली सुंदरी, सदोगताप संचरी, शिवं तनोतु पार्वती।।

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)