Chandra Grahan 2024 Zodiac Impact : हिंदू पंचागनुसार, फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळीचा सण साजरा केला जातो. यावर्षी २५ मार्चला देशभरात होळीचा उत्सव उत्साहाने साजरा केला जाणार आहे पण त्याचबरोबर या दिवशी वर्षातील पहिले चंद्रग्रहण सुद्धा आहे . ज्योतिषशास्त्रानुसार तब्बल १०० वर्षानंतर होळीच्या दिवशी चंद्रग्रहण असणार आहे. याचा प्रभाव तीन राशींच्या जीवनावर दिसून येईल. या दरम्यान या लोकांचा सुवर्ण काळ सुरू होऊ शकतो.
ज्योतिषशास्त्रानुसार पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण असल्यामुळे याचा परिणाम राशीचक्रातील १२ राशींवर दिसून येईल. ग्रहणाच्या वेळी चंद्र हा कन्य राशीमध्ये विराजमान असेल. कन्या राशीमध्ये यापूर्वीच राहू विराजमान आहे.अशात दोन ग्रहांची युती तीन राशींसाठी फायद्याची ठरू शकते. १०० वर्षानंतर येणाऱ्या या खास योगमुळे कोणत्या तीन राशीचे नशीब पालटू शकते, जाणून घेऊ या.

मेष

ज्योतिषशास्त्रानुसार, या राशीच्या लोकांना होळीच्या दिवशी असणाऱ्या ग्रहणाचा फायदा होऊ शकतो.या दिवशी या लोकांना प्रगतीचे मार्ग दिसून येईल. या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो एवढंच नाही तर यांना अडकलेली धन संपत्ती परत मिळू शकते. यांच्या धन संपत्तीमध्ये वृद्धी होईल ज्यामुळे या लोकांचा आत्मविश्वास वाढू शकतो.

हेही वाचा : Surya Gochar 2024: सूर्य करणार मीन राशीमध्ये प्रवेश, ‘या’ राशींचे बदलणार भाग्य; मिळणार अचानक लाभ

तुळ

तुळ राशीच्या लोकांसाठी सुद्धा हा काळ फायदेशीर राहील. प्रॉपर्टी खरेदी करण्याचा योग दिसून येईल. तुळ राशीच्या लोकांचा मान सन्मान वाढेल.करिअरमध्ये गोड बातमी मिळू शकते. नोकरी किंवा व्यवसायाच्या दृष्टीकोनातून समाधान मिळेल. तुळ राशीचे लोक धन संपत्ती गोळा करतील. आर्थिक वृद्धी होईल.

कुंभ

होळीच्या दिवशी चंद्रग्रहण आल्यामुळे, या दिवसापासून कुंभ राशीचे चांगले दिवस सुरू होतील. कुंभ राशीच्या लोकांना नोकरीच्या नवीन संधी दिसून येईल. याशिवाय या राशीच्या लोकांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये सकारात्मक बदल दिसून येईल. पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात फायदा दिसून येऊ शकतो. या दरम्यान या लोकांच्या घरात शुभ काम घडताना दिसून येईल. या खास योगमुळे हे लोकं करिअरमध्ये उंची गाठतील आणि यांची प्रगती होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)