Today Rashi Bhavishya, 26 January 2023 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष:-

मानसिक स्थैर्य जपावे. घरातील वयस्कर मंडळींची काळजी घ्यावी. अधिकारी व्यक्तींची ओळख होईल. नवीन लोकांशी मैत्रीपूर्ण संबंध जोडले जातील.  मनातील इच्छा पूर्ण होतील.

former Vice President M Venkaiah Naidu criticises freebies trend
पक्ष बदलला की जुन्या नेत्यांना शिव्या देणं चुकीचं: माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंची टीका
mahayuti searching non controversial new face for nashik lok sabha seat
महायुतीतर्फे नव्या चेहऱ्याचा शोध; नाशिकमध्ये वाद टाळण्याचा प्रयत्न; जागा कोणत्या पक्षाला जाणार हे अस्पष्टच
Shani Nakshatra Gochar On 6th April 2024
३ दिवसांनी शनीचे नक्षत्र गोचर होताच ‘या’ राशींच्या नशिबाचं टाळं उघडणार; रिकामी तिजोरी धन-धान्याने भरण्याचे संकेत
manoj jarange lok sabha election marathi news
जरांगे यांच्या निर्णयानंतर ‘मराठा मतपेढी’ ला आकार येण्याबाबत साशंकता

वृषभ:-

जोडीदाराविषयीचे गैरसमज मनातून काढून टाकावेत. भागिदारीतून लाभ संभवतो. कामात चलबिचलता आड येऊ शकते. मौल्यवान वस्तु खरेदी केल्या जातील. वाहनविषयक कामे पार पडतील.

मिथुन:-

वरिष्ठांचे धोरण लक्षात घ्यावे. आपला मान जपण्याचा प्रयत्न करावा. मनातील निराशा दूर सारण्याचा प्रयत्न करावा. काहीसा मानसिक ताण जाणवेल. कामातून आनंद शोधावा.

कर्क:-

मुलांच्या आनंदात रमून जाल. नवीन विषयात रुची दाखवाल. करमणुकीचे कार्यक्रम पहायला जाल. भावंडांना मदत कराल. गुरुकृपेचा लाभ घ्यावा.

सिंह:-

घरातील गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे. दिवसभर कामात गुंतून राहाल. टापटिपीकडे विशेष लक्ष द्याल. छुप्या शत्रूंचा विरोध मावळेल. जमिनीच्या कामात रस घ्याल.

कन्या:-

जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. आरोग्यात सुधारणा होईल. हातातील कामे सुरळीत पार पडतील. वैवाहिक जीवनाला बहर येईल.

तूळ:-

आवडी-निवडीबाबत दक्ष राहाल. भावंडांच्या समस्या जाणून घ्याव्यात. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. हातापायाला किरकोळ इजा संभवते. चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नका.

वृश्चिक:-

दिवस आपल्या मनाप्रमाणे घालवाल. तुमचा मान वाढेल. चारचौघात कौतुकास पात्र व्हाल. खर्चाला नवीन वाटा फुटू शकतात. कुटुंबात तुमचा दबदबा राहील.

धनू:-

संयम राखणे गरजेचे ठरेल. घाईने कोणतेही काम करू नका. कौटुंबिक समस्यांकडे अधिक लक्ष द्यावे. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. थोडे धाडस दाखवावे लागेल.

मकर:-

संयम सोडून चालणार नाही. नवीन गोष्टींची जबाबदारी वाढू शकते. सामाजिक वादात पडू नये. धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे. काही खर्च अचानक येवू शकतात.

कुंभ:-

फार विचार करू नयेत. कामाचा ताण जाणवेल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ संभवतो. वेळेचे महत्व लक्षात घ्यावे. योग्य नियोजनावर भर द्यावा.

मीन:-

तोंडात साखर ठेवून बोलाल. मैत्रीचे संबंध सुधारतील. मनाजोगी खरेदी करता येईल. कामाच्या ठिकाणी बदलीचे वारे वाहू लागतील. सर्वांशी मिळूनमिसळून वागाल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर