scorecardresearch

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शुक्रवार ५ ऑगस्ट २०२२

Daily Rashi Bhavishya In Marathi: आजचं राशिभविष्यानुसार मीन राशीच्या व्यक्तींना कौटुंबिक बाबीत यश मिळेल. घरात आनंदी वातावरण राहील.

Daily Horoscope in Marathi, Rashi Bhavishya In Marathi
आजचे राशीभविष्य ०९ ऑगस्ट, (Dainik Rashi Bhavishya)

Today Rashi Bhavishya, 05 August 2022 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष (Aries Horoscope Today ):-

मानमरातब वाढेल. सामाजिक जाणीव ठेवून वागाल. मित्रांचे संपूर्ण सहकार्य लाभेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. आध्यात्मिक आवड वाढेल.

वृषभ (Taurus Horoscope Today ):-

स्थावर मालमत्तेच्या कामातून लाभ होईल. घरात चांगल्या बातम्या येतील. तुमच्या पराक्रमात वाढ होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. इच्छापूर्तीचा दिवस.

मिथुन (Gemini Horoscope Today ):-

दिवसाची सुरुवात आनंदी होईल. आज तुमच्या मनातील इच्छेला अधिक बळ मिळेल. अडचणीतून मार्ग निघेल. दिवस कार्यपूर्तीत जाईल. गोष्टी मनासारख्या घडून येतील.

कर्क (Cancer Horoscope Today ):-

मानसिक चिंतेला बाजूला सारावे. स्वत:विषयीच्या चुकीच्या कल्पना काढून टाका. लपवाछपवीची कामे करू नका. बदलाची अपेक्षा कराल. अतिउत्साह दाखवायला जाऊ नका.

सिंह (Leo Horoscope Today ):-

मनोवांच्छित लाभेल. चर्चेतून कोंडी फुटेल. वाहन जपून चालवावे. भविष्या संदर्भातील एखादी योजना आखाल. निराशेतून मार्ग काढाल.

कन्या (Virgo Horoscope Today ):-

नवीन सोयी कराल. कामापेक्षा इतर गोष्टींकडे लक्ष जाईल. व्यापारीवर्ग खूश राहील. धावपळीतून यशाचा मार्ग खुला होईल. प्रलंबित कामे पूर्ण करावीत.

तूळ (Libra Horoscope Today ):-

नवीन गोष्टीत रमून जाल. व्यवहार सावधानतेने करावेत. तुमच्या मान सन्मानात वाढ होईल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. कामात सुलभता येईल.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today ):-

टोकाची भूमिका घेऊ नका. अचानक धनलाभ होऊ शकतो. शेअर्सच्या कामातून लाभ संभवतो. काही कामे कमी श्रमात पार पडतील. हातातील कामातून समाधान लाभेल.

धनू (Sagittarius Horoscope Today ):-

आज जोडीदार तुमच्यावर खूश राहील. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. भागीदाराशी सलोखा वाढेल. तुमचा आत्मविश्वास वाढीस लागेल. बोलण्यातील व्यर्थता टाळावी.

मकर (Capricorn Horoscope Today ):-

कामाच्या ठिकाणी प्रशंसा केली जाईल. हाताखालील लोक विश्वासू मिळतील. कामाचा उरक वाढेल. उगाच वादात पडू नका. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका.

कुंभ (Aquarius Horoscope Today ):-

आज दिवसभर मौजमजा कराल. मित्रांचा फड जमवण्याचा प्रयत्न कराल. करमणूक प्रधान दिवस राहील. मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील. विनाकारण तर्क-वितर्क करू नका.

मीन (Pisces Horoscope Today ):-

कौटुंबिक बाबीत यश मिळेल. घरात आनंदी वातावरण राहील. अनावश्यक खर्चात वाढ होण्याची शक्यता. हितशत्रू परास्त होतील. जोडीदाराच्या भावना समजून घ्या.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Horoscope today 05 august 2022 daily astrology rashi bhavishya in marathi msr

ताज्या बातम्या