Daliy Horoscope Updates: वैदिक ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाला विशेष महत्व आहे. हे ग्रह एका ठरावीक कालावधीनंतर राशी किंवा नक्षत्र बदल करत असतात. ज्याचा परिणाम प्रत्येक राशींच्या लोकांच्या जीवनावर दिसून येतो. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राश आहेत, या बारा राशींपैकी काही राशींवर ग्रह, नक्षत्र गोचर आणि ग्रहांच्या संयोगाने निर्माण होणाऱ्या राजयोगाचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडत असतो. अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेवरुन त्याचा मूल्यांक शोधला जातो आणि त्यानुसार व्यक्तीचे स्वभाव आणि भविष्याविषयी अंदाज बांधला जातो. याशिवाय चाणक्य नितीच्या माध्यमातूनही व्यक्तीला समाजात वावरताना कोणत्या निती नियमांचे पालन केले पाहिजे याविषयीची माहिती दिली जाते. दरम्यान आजचा दिवस १२ राशींसाठी नेमका कसा जाईल जाणून घेऊ…

Live Updates

Today Horoscope 8 June 2025: आजचे राशिभविष्य ८ जून २०२५

12:16 (IST) 8 Jun 2025

शनीदेव निघाले तांब्याच्या पावलांनी; २०२७ पर्यंत 'या' एका राशीच्या जीवनात होणार मोठ्या उलाढाली? काय होणार तुमच्या नशिबाचे?

Shani Dev Gochar 2025: शनीदेव पुढील काही काळ एका राशीच्या कुंडलीत तांब्याच्या पावलांनी भ्रमण करत आहेत, ज्यामुळे एका राशीच्या जीवनात मोठ्या उलाढाली होणार आहेत. ...सविस्तर वाचा
09:18 (IST) 8 Jun 2025

या मूलांकाच्या लोकांचा स्वभाव असतो रहस्यमयी! घरात आणि बाहेर वेगळे वागतात हे लोक, प्रत्येक परिस्थितीत बदलते त्यांचे रूप

जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ८, १७ किंवा २६ तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक ८ आहे. मूलांकाचा स्वामी शनिदेव मानला जातो, जो न्याय, शिस्त आणि कर्माचे प्रतीक आहे. ...सविस्तर वाचा
09:13 (IST) 8 Jun 2025

उद्यापासून ‘या’ ३ राशींचे नशीब पालटणार? शक्तीशाली ‘महालक्ष्मी राजयोग’ घडून येताच प्रत्येक कामात मिळणार यश!

एक शक्तिशाली ‘महालक्ष्मी राजयोग’ ९ जून २०२५ रोजी तयार होतोय, जो काही निवडक राशींवर लक्ष्मीमातेची कृपा घेऊन येणार आहे. चंद्र आणि मंगळ यांचा खास संयोगातून हा योग निर्माण होत असून, त्याचा प्रभाव काही राशींवर राहणार आहे.

08:39 (IST) 8 Jun 2025

गजकेसरी राजयोग बँक बॅलन्स वाढवणार; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना अपार श्रीमंतीसह मिळेल नवी नोकरी

१८ ऑक्टोबर रोजी गुरू रात्री ९ वाजून ३९ मिनिटांनी कर्क राशीत प्रवेश करेल आणि ५ डिसेंबरपर्यंत याच राशीत राहील. या काळात गुरूची कोणत्याना कोणत्यातरी ग्रहाबरोबर युती निर्माण होईल. याच काळात गुरूची चंद्राबरोबर युती निर्माण होईल. ज्यामुळे गजकेसरी राजयोग निर्माण होईल. सविस्तर वाचा

08:22 (IST) 8 Jun 2025

Guru Asta 2025 : गुरुच्या अस्ताने ‘या’ तीन राशींचे नशीब फळफळणार, नोकरी, व्यवसायात प्रचंड यश अन् मिळेल बक्कळ पैसा

Guru Ast 2025 : वैदिक पंचागानुसार, १० जून २०२५ रोजी गुरु मिथुन राशीत अस्त होईल आणि २७ दिवस या स्थितीत राहील. गुरु १० जून २०२५ रोजी संध्याकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी पुन्हा अस्त होईल आणि ९ जुलै रोजी पुन्हा उदय होईल. ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा एखादा ग्रह अस्त होतो तेव्हा त्याची प्रभावशीलता कमी होते, परंतु ग्रहाची ही स्थिती काही राशींसाठी शुभ ठरते. गुरुच्या अस्तामुळे काही राशींच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारू शकते, पण नेमकं कोणत्या राशींना याचा फायदा होतो जाणून घेऊया. सविस्तर वाचा

07:52 (IST) 8 Jun 2025

Chanakya Niti: योग्य मुलगी शोधताय? ‘अशा’ स्वभावाच्या मुली ठरतात उत्तम पत्नी आणि सून; घरात सुख, समृद्धी अन् समाधान घेऊन येतात!

Relationship Advice from Chanakya: चाणक्य हे भारतातील एक असे नाव आहे, ज्यांचे आजही लाखो लोक आदराने स्मरण करतात. समाजाच्या मार्गदर्शनासाठी त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आणि अनेक सिद्धांत रचले. त्यांची तत्त्वे केवळ राजकारणातच नव्हे तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात उपयुक्त आहेत. चाणक्य यांनी अशा महिलांचा उल्लेख केला आहे, ज्या एखाद्या व्यक्तीच्या जीवनसाथी बनल्या, तर त्याचे आयुष्य बदलण्यास वेळ लागत नाही. सविस्तर वाचा

07:50 (IST) 8 Jun 2025

Aajche Rashi Bhavishya: स्वाती नक्षत्र कोणासाठी ठरणार शुभ? मेष ते मीनपैकी कोणाला लाभ तर कोणाला वादाला सामोरं जावं लागणार

Today Horoscope in Marathi, 8 June 2025 : तर आज स्वाती नक्षत्रात तुमच्या आयुष्यात काय चांगले बदल होणार जाणून घेऊ... सविस्तर वाचा

 

 

Horoscope Today Updates (Photo:Pixabay)