Horoscope Today : आजचं राशीभविष्य, मंगळवार ९ ऑगस्ट २०२२

Daily Rashi Bhavishya In Marathi: आजचं राशिभविष्यानुसार कर्क राशीच्या व्यक्तींनी आहारावर नियंत्रण ठेवावे. काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील..

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, मंगळवार ९ ऑगस्ट २०२२
आजचे राशीभविष्य १८ ऑगस्ट, (Dainik Rashi Bhavishya)

Today Rashi Bhavishya, 09 August 2022 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष (Aries Horoscope Today ):-

विवाह बोलणी लांबणीवर पडू शकतात. परिचयातील व्यक्तीचे हित ओळखावे. अनोळखी व्यक्ती मदत करतील. मेहनतीला पर्याय नाही. विरोधक नामोहरम होतील.

वृषभ (Taurus Horoscope Today ):-

विचारपूर्वक निर्णय घ्यावा. भागीदारीच्या व्यवसायाकडे लक्ष ठेवावे. अति उत्साहाने कामे बिघडू शकतात. मित्रांच्या भेटीने शुभ वार्ता मिळतील. उगाच तर्क-वितर्क करत बसू नका.

मिथुन (Gemini Horoscope Today ):-

आंधळा विश्वास ठेऊ नका. नेमक्या मुद्यांवर लक्ष ठेवा. आर्थिक अडचण फार जाणवणार नाही. कुटुंबातील सदस्यांची मते जाणून घ्या. गोडी-गुलाबीचे धोरण ठेवावे.

कर्क (Cancer Horoscope Today ):-

आहारावर नियंत्रण ठेवावे. काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील. घरगुती गोष्टीत तिखट प्रतिक्रिया देऊ नका. मन विचलीत होऊ शकते. जुनी कामे आधी हातावेगळी करावीत.

सिंह (Leo Horoscope Today ):-

चर्चेतून मार्ग काढावा. गुंत्यातून बाहेर पडाल. हातातील कामात यश येईल. मित्रांच्या भेटीचे योग आहेत. खर्चावर नियंत्रण ठेवावे.

कन्या (Virgo Horoscope Today ):-

भडक मार्गाचा अवलंब करू नका. मनाची चंचलता आवरावी लागेल. फसवणुकीपासून सावध राहावे. प्रलंबित कामे प्राधान्याने हाती घ्यावीत. ज्येष्ठांची काळजी घ्यावी.

तूळ (Libra Horoscope Today ):-

काही तरी नवीन शिकल्याचा आनंद मिळेल. कौशल्याने कामे कराल. इतरांना मदत केल्याचा आनंद मिळेल. समस्यांचे निराकरण होईल. उत्तम व्यावसायिक लाभ होईल.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today ):-

जुने गैरसमज दूर होतील. अवाजवी खर्च टाळावा. दिवस प्रसन्नतेत जाईल. कामातील सुलभतेकडे अधिक लक्ष ठेवाल. पित्त विकारात वाढ होऊ शकते.

धनू (Sagittarius Horoscope Today ):-

उपासनेत मन रमवावे. शांतता हवीशी वाटेल. वाहन विषयक समस्या मिटतील. मुलांचे वागणे नाराजीचे भासू शकते. सकारात्मक दृष्टीकोनात वाढ होईल.

मकर (Capricorn Horoscope Today ):-

घरातील वातावरण शांत ठेवावे. यांत्रिक कामात लक्ष घालाल. स्थावरचे प्रश्न मार्गी लावावेत. नियोजित कामे पार पडतील. वैचारिक स्थैर्य जपावे.

कुंभ (Aquarius Horoscope Today ):-

वादाचे मुद्दे टाळावेत. दिवस आळसात घालवू नका. देण्या-घेण्याचे व्यवहार पूर्ण होतील. जवळच्या मित्रांशी वाद घालू नका. चैनीत दिवस घालवाल.

मीन (Pisces Horoscope Today ):-

आरोग्यात सुधारणा होईल. आततायीपणे वागून चालणार नाही. खर्च नियोजनात ठेवावा. अपचनाचा त्रास जाणवू शकतो. आर्थिक गोष्टीवरून वाद टाळावा.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
मंगळ ग्रहाचा वृषभ राशीत प्रवेश, या ३ राशींना लाभ आणि प्रगतीची दाट शक्यता
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी