आजचं राशीभविष्य, शुक्रवार १ जुलै २०२२

आजचं राशिभविष्यानुसार कुंभ राशीच्या व्यक्तींनी वादाच्या मुद्यांपासून दूर राहावे. बोलण्याआधी सारासार विचार करावा.

Daily Horoscope in Marathi, Rashi Bhavishya In Marathi
आजचे राशीभविष्य ११ ऑगस्ट, (Dainik Rashi Bhavishya)

मेष:-

मानसिक अस्वस्थता काही प्रमाणात जाणवेल. क्षुल्लक कारणावरून वाद वाढवू नका. सामुदायिक बाबींचे भान राखावे. कौटुंबिक कामात अधिक वेळ जाईल. मनात नसत्या चिंतांना थारा देऊ नका.

वृषभ:-

व्यापारातून चांगला आर्थिक लाभ होईल. तुमची आर्थिक अडचण दूर होईल. मनातील इच्छा पूर्ण होईल. स्थावरच्या व्यवहारात अधिक लक्ष घालावे लागेल. जवळच्या मित्रांची नाराजी दूर करावी.

मिथुन:-

कामाची धांदल उडेल. योग्य व नियोजनबद्ध कामे आखावीत. आपले विचार अधिक स्पष्ट मांडण्याचा प्रयत्न करावा. गप्पांमध्ये अधिक वेळ घालवू नका. मानसिक चंचलतेला आवर घालावी.

कर्क:-

वैचारिक शांतता जपावी. वरिष्ठांच्या मर्जीने वागावे लागेल. मौजमजा करण्याकडे अधिक कल राहील. कौटुंबिक खर्च आटोपता ठेवावा लागेल. उगाचच कोणाचाही रोष ओढावून घेऊ नका.

सिंह:-

प्रकृतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. वातविकाराचा त्रास संभवतो. मनातील चुकीचे विचार काढून टाकावेत. अति काळजी करणे योग्य नाही. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी.

कन्या:-

भागीदारीतील लाभाकडे लक्ष ठेवावे लागेल. तुमचा जनसंपर्क वाढेल. ओळखीच्या लोकांशी वादात अडकू नका. काही गोष्टीत तडजोडीला पर्याय नाही. नातेवाईकांचे विचार जाणून घ्यावेत.

तूळ:-

बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. पित्त विकाराचा त्रास संभवतो. नवीन गुंतवणूक करताना सारासार विचार करावा. सहकार्‍यांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. चटकन कोणावरही विश्वास ठेऊ नका.

वृश्चिक:-

तुमची चिडचिड वाढू शकते. आज वेळ चुकवून चालणार नाही. न आवडणार्‍या गोष्टींचा देखील स्वीकार करावा लागेल. स्वभावातील तामसी वृत्तीत वाढ होईल. वाहन चालवताना सावधानता बाळगावी.

धनू:-

कौटुंबिक बाबी जुळवून घ्याव्या लागतील. समोरील प्रश्न शांततेने सोडवावे लागतील. घरातील वातावरण तप्त राहील. योग्य वेळेसाठी थांबावे लागेल. प्राथमिक स्वरुपात पुढील गोष्टींचे अंदाज बांधावेत.

मकर:-

मुलांच्या बाबत आपण समाधानी राहाल. भावंडांचे सहकार्य मिळेल. प्रवासात फार घाई उपयोगाची नाही. आपले मत शांततेने मांडावे. आनंदी दृष्टीकोन बाळगावा.

कुंभ:-

वादाच्या मुद्यांपासून दूर राहावे. बोलण्याआधी सारासार विचार करावा. घरगुती वातावरण प्रसन्न राहील. नवीन गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न कराल. तामसी पदार्थ खाल.

मीन:-

चुकीच्या कामांमध्ये हात घालू नका. भडक विचार नोंदवू नका. छंद जोपासण्यात वेळ घालवावा. हातातील कलेला वाव द्यावा. नातेवाईकांना मदतीचा हात पुढे कराल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Horoscope today 1 july 2022 daily astrology rashi bhavishya in marathi msr

Next Story
Surya Gochar 2022: मिथुन राशीत सूर्याचे होणार संक्रमण, ‘या’ ३ राशींचे भाग्य उघडणार
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी