Today Rashi Bhavishya, 12 August 2022 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य. मेष (Aries Horoscope Today ):- कार्यक्षेत्रात एखादे परिवर्तन घडून येईल. संवेदनशीलता ठेवावी लागेल. उष्णतेचा त्रास जाणवेल. पोटाची तक्रार जाणवू शकेल. आजचा दिवस परोपकार करण्यात जाईल. वृषभ (Taurus Horoscope Today ):- निर्णय ऐनवेळी बदलावे लागू शकतात. डोळ्याचे विकार संभवतात. मनातील इच्छा पूर्णत्वास जाईल. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. दिवस गप्पा व मौजमजेत जाईल. मिथुन (Gemini Horoscope Today ):- टीका कारांकडे दुर्लक्ष करावे. आपल्या जवळील आनंद लक्षात घ्यावा. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. मनोबल वाढीस लागेल. वाहन चालवताना काळजी घ्यावी. कर्क (Cancer Horoscope Today ):- निष्कारण वादंग नको. मनातील गोष्टी उघडपणे बोलणे टाळाल. घरगुती जबाबदारीत वाढ होईल. कामाचा ताण जाणवेल. घाईने निर्णय घेऊ नयेत. सिंह (Leo Horoscope Today ):- मनातील स्वप्न साकार होईल. आपले मत स्पष्टपणे मांडाल. मुलांबाबतच्या जबाबदार्या पार पाडाल. राजकीय व्यक्तींना उत्तम लाभ मिळतील. कौटुंबिक वातावरण खेळकर राहील. कन्या (Virgo Horoscope Today ):- दिवस आनंदात जाईल. आपल्या मनाप्रमाणे गोष्टी कराल. परस्पर संवादातून सुखद बदल होतील. विरोधक नरम भूमिका घेतील. कलेतील नवीन गोष्टी शिकायला मिळतील. तूळ (Libra Horoscope Today ):- ज्येष्ठ मंडळींचा आशीर्वाद लाभेल. मनातील चलबिचलता काढून टाकावी. जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे. दिनक्रम व्यस्त राहील. वृश्चिक (Scorpio Horoscope Today ):- व्यावसायिक स्तरावर अनुकूल घटना घडतील. मित्रांचे सहकार्य लाभेल. प्रापंचिक ताण कमी होईल. प्रिय व्यक्तीच्या भेटीचे योग. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. धनू (Sagittarius Horoscope Today ):- जिद्द सोडून चालणार नाही. परिस्थितीशी जमवून घ्यावे लागेल. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल. कौटुंबिक कामात अधिक वेळ जाईल. समोरील गोष्टींकडे सकारात्मकतेने पहावे. मकर (Capricorn Horoscope Today ):- मनावर कोणताही दबाव न आणता वागावे. निर्णयाची कारणमीमांसा कराल. आपल्या मतावर अडून राहाल. धार्मिक गोष्टीमध्ये जास्त लक्ष घालावे. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. कुंभ (Aquarius Horoscope Today ):- समोरच्याचे मत खोडून काढाल. ठाम भूमिका घ्याल. हातातील अधिकाराचा वापर कराल. अचानक धनलाभ संभवतो. अति काळजी करण्यात वेळ वाया घालवू नका. मीन (Pisces Horoscope Today ):- आवडी-निवडी बाबत आग्रही राहाल. फार चिडचिड करू नका. कौटुंबिक वातावरण खेळकर ठेवावे. मानसिक शांतता लाभेल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. – ज्योतिषी विद्याधर करंदीकर