Today Horoscope in Marathi 14 September 2025: आज १४ सप्टेंबर २०२५ रोजी भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी असणार आहे. आज वज्र सिद्धि योग आणि रोहिणी नक्षत्र जागृत असणार आहे. आज राहू काळ ४ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते ६ वाजेपर्यंत असणार आहे. चला तर मग जाणून घेऊया आजचा दिवस १२ राशींसाठी नेमका कसा जाणार आहे.

१४ सप्टेंबर २०२५ राशिभविष्य व पंचांग (14 September 2025 Horoscope in Marathi)

मेष राशिभविष्य (Today Horoscope Aries 14 September)

घरात उत्साहाचे वातावरण राहील. आवश्यक तेथेच बढाया मारा. भौतिक विकास होईल. एखादा नवीन करार होण्याची शक्यता. आरोग्यात सुधारणा होईल.

वृषभ राशिभविष्य (Today Horoscope Taurus 14 September)

कौटुंबिक खर्च वाढेल. घरात मानाची वागणूक मिळेल. कामातील नवीन योजनांवर भर द्यावा. कुटुंबासमवेत वेळ चांगला जाईल. मनोकामना पूर्णत्वास जाण्याचे योग.

मिथुन राशिभविष्य (Today Horoscope Gemini 14 September)

आपले मानसिक आरोग्य स्वस्थ ठेवा. करमणुकीच्या साधनात जास्त वेळ घालवाल. घरातील ज्येष्ठ मंडळींशी चर्चा कराल. मानसिक शांतता व समाधान लाभेल. एखादे काम पूर्ण दिवस घेईल.

कर्क राशिभविष्य (Today Horoscope Cancer 14 September)

अति धाडसाने कोणताही निर्णय घेऊ नका. आपल्या बोलण्यात स्पष्टता ठेवाल. सृजनात्मक कार्यातील आवड वाढेल. हातातील कामात यश येईल. सहकारी संपूर्ण सहकार्य करतील.

सिंह राशिभविष्य (Today Horoscope Leo 14 September)

समोरच्या व्यक्तीच्या मतांचा आदर करावा. मुलांबरोबर वेळ आनंदात जाईल. दिनक्रम व्यस्त राहील. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. वरिष्ठ अधिकार्‍यांशी जुळवून घ्यावे लागेल.

कन्या राशिभविष्य (Today Horoscope Virgo 14 September)

अनाठायी खर्चाला बळी पडू नका. कामातील नवीन संधी शोधाव्यात. व्यावहारिक सावधानता बाळगावी. वाणी संयमित असावी. प्रेमातील व्यक्तींना नवीन उत्साह लाभेल.

तूळ राशिभविष्य (Today Horoscope Libra 14 September)

सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. जोडीदाराशी अति वाद टाळावा. आजचा दिवस लाभदायक. नवीन प्रकल्प हाती घेऊ शकता. एखादा जुना वाद संपुष्टात येईल.

वृश्चिक राशिभविष्य ((Today Horoscope Scorpio 14 September)

तुमची मते इतरांना मान्य होतील. अति तिखट पदार्थ टाळा. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. नोकरदार वर्गाला दिलासादायक बातमी मिळेल.

धनु राशिभविष्य (Today Horoscope Sagittarius 14 September)

गूढ गोष्टींचे वाचन कराल. तुमचा सल्ला लोक ऐकतील. कामात जोखीम पत्करावी लागेल. नेहमीच्या कामात काहीसा बदल करून पाहावा. नवीन संधी हेरता आली पाहिजे.

मकर राशिभविष्य (Today Horoscope Capricorn 14 September)

अति जड पदार्थ खाऊ नयेत. विनाकारण पैसे खर्च होतील. घरातील कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. एकाच वेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका.

कुंभ राशिभविष्य (Today Horoscope Aquarius 14 September)

विद्यार्थांच्या इच्छा पूर्ण होतील. जोडीदाराचे मत शांतपणे ऐकावे. संमिश्र घटनांचा दिवस. आहारावर नियंत्रण ठेवावे. कामे उरकण्याची घाई कराल.

मीन राशिभविष्य (Today Horoscope Pisces 14 September)

घरात नवीन वस्तूंची खरेदी कराल. जुने परिचित लोक भेटतील. व्यापारी वर्गाला सुखकारक दिवस. सामाजिक स्तरावर मान वाढेल. संयमाने समोरील समस्येचे निराकरण करू शकाल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर