आजचं राशीभविष्य, सोमवार, १९ जुलै २०२१

आजच्या राशीभविष्यानुसार वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या कामातील अडचणी कमी होतील. स्थावर संबंधी व्यवहार पुढे सरकतील.

Horoscope Today Daily Horoscope Rashi Bhavishya in Marathi
सर्व बारा राशींसाठीचे आजचे राशीभविष्य

मेष:-

मानसिक ताण तणावापासून दूर राहावे. पत्नीला कामात सहकार्य करावे. स्वभावात काहीसा तिरकसपणा येऊ शकतो. निष्कारण येणारी उदासी टाळावी. अचानक धनलाभ संभवतो.

वृषभ:-

अभ्यासूपणे काम करावे लागेल. कामाचा फार गवगवा करू नका. संसर्गजन्य विकारांपासून सावधानता बाळगावी. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. नवीन योजनांची अंमलबजावणी करावी.

मिथुन:-

मनातील भावना उत्कृष्टपणे मांडाव्यात. हातातील कामात यश येईल. ठरवलेली कामे समाधानकारक फळ देतील. घरातील जबाबदारी उत्तमरीत्या पेलाल. दिवसाची सुरुवात अनुकूल राहील.

कर्क:-

धरसोड वृत्ती टाळावी लागेल. कामाचा फार ताण घेऊ नका. विवेकाने केलेली कामे फळाला येतील. योग्य नियोजनावर भर द्यावी.  मनोरंजन, मौजमजा करण्यात अधिक वेळ घालवाल.

सिंह:-

इतरांचा विश्वास संपादन कराल. प्रिय व्यक्तीच्या शब्दात अडकाल. व्यवहारी दृष्टीकोन बाळगावा लागेल. हित शत्रू नरम होतील. घरात तुमचा वरचष्मा राहील.

कन्या:-

मनातील प्रेमभावनेत वाढ होईल. आवडत्या कामात गुंग व्हाल. कामे सुलभतेने पार पडतील. जोडीदाराशी ताळमेळ जुळवावा लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.

तूळ:-

कौटुंबिक वातावरणात रमाल. देणी-घेणी मिटतील. नामस्मरण केल्याने चित्त शांत होईल. कफाचे विकार संभवतात. परिश्रमानंतर इच्छित फळ मिळेल.

वृश्चिक:-

तरुणांनी भावनेच्या भरात निर्णय घेऊ नयेत.  कामातील अडचणी कमी होतील. स्थावर संबंधी व्यवहार पुढे सरकतील. जोखीम घेऊन कामे स्वीकारावी लागतील. स्वत:च्या मनाप्रमाणे वागाल.

धनू:-

इतरांच्या वागण्याचा फार विचार करू नका. नवीन बदल स्वीकारावे लागतील. मन काहीसे विचलित राहील. अंतर्गत विरोध होण्याची शक्यता. कामे विचारपूर्वक करावीत.

मकर:-

डोके शांत ठेवून कामात लक्ष घालावे. नवीन गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. योग्य संधीचा लाभ घ्यावा. व्यापार्‍यांना काही चांगले लाभ होतील. गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल.

कुंभ:-

जुळून आलेली घडी विस्कटू देऊ नका. चुकीच्या गोष्टींची चर्चा टाळावी. बोलताना संयम राखावा. आळस झटकून कामाला लागावे. अनाठायी खर्चाला आळा घालावा.

मीन:-

चुकीच्या संगती पासून दूर राहावे. स्वमतावर ठाम राहावे. जबाबदारी झटकून चालणार नाही. स्वत:वर ठाम विश्वास ठेवावा. अधिकारी वर्गाशी ताळमेळ साधावा.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व आजचे भविष्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Horoscope today 19 july 2021 daily astrology rashi bhavishya in marathi msr

Next Story
आजचे राशीभविष्य, सोमवार, ५ डिसेंबर २०१६Astrology, horoscope, आजचे राशीभविष्य
ताज्या बातम्या