Today Horoscope 20 August 2025 in Marathi: आज २० ऑगस्ट २०२५ रोजी श्रावण कृष्ण पक्षातील द्वादशी तिथी आहे. द्वादशी तिथी दुपारी १ वाजून ५८ मिनिटांपर्यंत राहील. आज पुनर्वसु नक्षत्र जागृत असेल आणि सिध्दि योग जुळून येईल. तसेच आज राहू काळ दुपारी १२ वाजून २४ मिनिटांनी सुरु होईल ते ०२ वाजून ०२ मिनिटांपर्यंत असणार आहे. चला तर मग जाणून घेऊया, आजचा बुधवारचा दिवस १२ राशींसाठी नेमका कसा जाणार आहे.

२० ऑगस्ट २०२५ राशिभविष्य व पंचांग (20 August 2025 Horoscope in Marathi)

आजचे मेष राशिभविष्य (20 August Zodiac Aries Horoscope)

आज दिवसभर कार्यरत राहाल. बोलण्यात मधाळपणा बाळगावा. कामासंबंधी मनात संभ्रम बाळगू नका. गणपतीची उपासना करा. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव दिसून येईल.

आजचे वृषभ राशिभविष्य (20 August Zodiac Taurus Horoscope)

गोड बोलून सर्व कामे निभावून न्याल. कौटुंबिक वातावरण आनंदी व उत्साही राहील. चांगली पुस्तके वाचनात येतील. सहकार्‍यांची मदत घ्याल. चमचमीत पदार्थांचा आस्वाद घ्याल.

आजचे मिथुन राशिभविष्य (20 August Zodiac Gemini Horoscope)

अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करावा. जोडीदारावर विश्वास ठेवावा. वरिष्ठांची मनधरणी करावी लागू शकते. नवीन योजनांची अंमलबजावणी करावी. मैत्रीतील सलोखा कायम ठेवावा.

आजचे कर्क राशिभविष्य (20 August Zodiac Cancer Horoscope)

महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक करा. समोरील व्यक्तीशी वाद टाळावा. अति गोड पदार्थ खाणे टाळावे. दिवस अनुकूल जाईल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल.

आजचे सिंह राशिभविष्य (20 August Zodiac Leo Horoscope)

बौद्धिक चातुर्य दर्शवाल. वरिष्ठांना विश्वासात घेऊन कार्य तडीस न्यावे. हलका आहार घ्यावा. आध्यात्मिक प्रगती करता येईल. विरोधकांचा त्रास कमी होईल.

आजचे कन्या राशिभविष्य (20 August Zodiac Virgo Horoscope)

मित्रांची मदत होईल. मनात उगाच नसत्या शंका आणू नका. नातेवाईकांचा रूसवा काढावा लागेल. लहान-सहान दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका. मनासारखे कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल.

आजचे तूळ राशिभविष्य (20 August Zodiac Libra Horoscope)

समाधानी दिवस असेल. नवीन कामात समाधानी राहाल. नातेवाईकांच्या गाठीभेटी घडतील. नवीन प्रकल्पावर काम चालू कराल. मौजमजेवर पैसे खर्च होतील.

आजचे वृश्चिक राशिभविष्य (20 August Zodiac Scorpio Horoscope)

आळस झटकून कामाला लागावे. दीर्घ प्रतीक्षेच्या कामात यश येईल. आर्थिक पातळीवर समाधान मिळेल. समोरील संधीचे सोने करावे. कामानिमित्त घराबाहेर राहावे लागू शकते.

आजचे धनु राशिभविष्य (20 August Zodiac Sagittarius Horoscope)

हातून सेवा घडेल. घरगुती कामे जलद गतीने पार पडतील. जुन्या गोष्टीवर चर्चा टाळावी. पारंपरिक विचार बाजूला सारून पहावेत. नातेवाईकांना मदत करावी लागू शकते.

आजचे मकर राशिभविष्य (20 August Zodiac Capricorn Horoscope)

दिवसभर कामात व्यग्र राहाल. घरातील जुन्या गोष्टीवर चर्चा करू नका. कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवाल. चिकाटीने व प्रामाणिकपणे कामे कराल. मुलांच्या वागण्याकडे लक्ष ठेवा.

आजचे कुंभ राशिभविष्य (20 August Zodiac Aquarius Horoscope)

काही गोष्टी अधिकार वाणीने सांगाव्यात. नवीन ओळखी सत्कारणी लागतील. भागीदारीत खुश असाल. नवीन विचारांना चालना द्यावी. मित्र जपून ठेवावेत.

आजचे मीन राशिभविष्य (20 August Zodiac Pisces Horoscope)

कौटुंबिक शांतता बाळगावी. बोलताना सौम्य शब्दांचा वापर करावा. व्यायामाचे फायदे लक्षात घ्या. व्यापारी वर्गाला अपेक्षित लाभ होईल. व्यवसाय वृद्धीचा विचार कराल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर