मेष:-

विचार करून मगच बोलावे. रागावर नियंत्रण ठेवा. जोडीदाराशी उगाच वाद घालू नका. भागीदारीत सबुरीने वागावे. भावंडांचे प्रश्न सोडवाल.

वृषभ:-

दिवस मनासारखा घालवाल. जास्त विचार करत बसू नका. चारचौघात कौतुक होईल. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. अचानक धनलाभाची शक्यता.

मिथुन:-

वैचारिक गुंतागुंत वाढेल. एकाच गोष्टीवर ठाम राहावे. जोडीदाराची साथ उत्तम लाभेल. पित्त विकाराचा त्रास जाणवेल. क्षुल्लक कारणावरून चिडू नका.

कर्क:-

कामाची दगदग वाढेल. सतत गुंतून राहाल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न ठेवा. सर्वांना आपलेसे करून घ्याल. क्षुल्लक मतभेदात अडकू नका.

सिंह:-

अधिकाराचा वापर करा. तुमच्याबाबत गैरसमज पसरू शकतो. कर्तुत्वाला चांगला वाव मिळेल. भावंडे तुमच्याविषयी तक्रार करू शकतात. स्वत:चा आब राखून वागाल.

कन्या:-

बोलताना सारासार विचार करून बोलावे. अतितिखट पदार्थ खाणे टाळावे. अपशब्द टाळण्याचा प्रयत्न करावा. हातात काही नवीन जोखमीची कामे येतील. भावंडांचे सहकार्य लाभेल.

तूळ:-

राग आवरावा. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल. काही जुने प्रश्न सामोरे येतील. घरगुती ताण आटोक्यात ठेवावा.

वृश्चिक:-

राजकारणी धोरण महागात पडू शकते. स्वत:चेच खरे कराल. मनासारखी विश्रांती मिळणार नाही. एकाच गोष्टीवर अडून राहू नका. कर्ज प्रकरणे वेळेवर हाताळा.

धनू:-

प्रत्येक गोष्टीकडे आनंदी नजरेने पहाल. सौंदर्यवादी दृष्टिकोन बाळगाल. आवडीचे पदार्थ चाखाल. कामे मनाजोगी पार पडतील. झोपेची तक्रार जाणवेल.

मकर:-

चिकाटी सोडून चालणार नाही. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. मुलांकडे बारीक लक्ष ठेवावे. पैज जिंकता येईल. कामातील बदल जाणून घ्या.

कुंभ:-

उद्दीष्ट साध्य करण्यासाठी तयार रहा. जुनी कोर्टाची कामे निघू शकतात. मित्रांच्या सहवासात रमाल. आवडती वस्तू खरेदी कराल. वरिष्ठांची मर्जी सांभाळा.

मीन:-

ईश्वर भक्तीत अधिक वेळ घालवाल. शारीरिक कष्ट अधिक संभवतात. किरकोळ दुखापत होण्याची शक्यता. अति अपेक्षा बाळगू नका. प्रवासाचा योग संभवतो.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर