Today Rashi Bhavishya, 24 September 2022 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष (Aries Horoscope Today ):-

Budh Gochar 2024 Aries budh transit in mesh these three zodiac sign will be success all sector
एक महिन्याने बुधाचे मेष राशीत गोचर; ‘या’ तीन राशीच्या लोकांचे चमकेल नशीब? अचानक धनलाभाची शक्यता
Shani Nakshatra Parivartan
पुढील ६ महिने ‘या’ राशींचे नशीब अचानक पलटणार? ३० वर्षानंतर शनिदेवाने नक्षत्र बदल केल्याने मिळू शकतो चांगला पैसा
Sagittarius April Horoscope
Sagittarius : धनु राशीच्या लोकांनी एप्रिल महिन्यात घ्यावी विशेष काळजी; कशी असेल त्यांची आर्थिक स्थिती अन् लव्ह रिलेशन? जाणून घ्या
shani surya yuti in kumbh rashi ended
शनि-सूर्याची युती संपली; या राशींचे लोक होतील मालामाल, मिळणार अमाप पैसै

नोकरीच्या नवीन संधी चालून येतील. वाहन खरेदीची इच्छा मनात येईल. मुलांबाबतची चिंता दूर होईल. आपली प्रतिभा सिद्ध करण्याची संधी मिळेल. प्रिय व्यक्तीकडून अपेक्षित सहकार्य मिळेल.

वृषभ (Taurus Horoscope Today ):-

मनाची चलबिचलता जाणवेल. विचार भरकटू देऊ नका. दिवस मध्यम फलदायी असेल. वादाचे मुद्दे टाळावेत. गुंतवणूक करताना जोखीम पत्करू नये.

वृषभ (Taurus Horoscope Today ):-

अकारण खर्च टाळावा. संमिश्र घटनांचा दिवस. कामात क्षुल्लक अडचणी येऊ शकतात. वातावरण लक्षात घेऊन काम करावे. अडकलेले धन प्राप्त होण्याची शक्यता.

कर्क (Cancer Horoscope Today ):-

कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल. नवीन व्यवसायास गती मिळेल. तुमचा मान वाढेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. नोकरदार वर्गाला उत्तम दिवस.

सिंह (Leo Horoscope Today ):-

चोख हिशोब ठेवावा. पैसा चांगल्या कामासाठी खर्च कराल. मान, सन्मानात वाढ होईल. दिवसभरात सकारात्मक वार्ता मिळेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.

कन्या (Virgo Horoscope Today ):-

लोकांकडून वाहवा मिळवाल. उत्तम सामाजिक दर्जा प्राप्त होईल. कामाचा ताण जाणवू शकतो. अति विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. कामातील प्रगतीकडे लक्ष ठेवा.

तूळ (Libra Horoscope Today ):-

स्वत:च्या सुखासाठी पैसा खर्च कराल. प्रतिपक्षावर मात कराल. धनलाभाचे योग जुळून येतील. तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल. परिस्थितीचा ताळमेळ साधाल.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today ):-

कौटुंबिक ताणतणाव टाळावेत. मित्रांशी जवळीक साधाल. मुलांची चिंता लागून राहील. क्रोधावर नियंत्रण ठेवावे. अधिकार्‍यांची गाठ पडेल.

धनू (Sagittarius Horoscope Today ):-

पैशाच्या बाबतीत हात आखडता घ्याल. जि‍भेवर ताबा ठेवावा. आर्थिक बाजू सुधारेल. आहाराची पथ्ये पाळावीत. मिळकतीचा नवीन स्त्रोत सापडेल.

मकर (Capricorn Horoscope Today ):-

जुन्या विचारांना मनातून काढून टाका. भावंडांशी मतभेदाची शक्यता. दिवस मध्यम फलदायी. व्यापारी वर्गाने सबुरीने घ्यावे. धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे.

कुंभ (Aquarius Horoscope Today ):-

मानसिक स्वास्थ्य ढळू देऊ नका. सट्टा, जुगारापासून दूर रहा. नवीन संधी मिळण्याची चिन्हे दिसू लागतील. विनाकारण प्रवास घडेल. महत्त्वाची कागदपत्रे सांभाळावीत.

मीन (Pisces Horoscope Today ):-

प्रतिस्पर्ध्याबरोबर हुशारीने वागावे. पैशाची गुंतवणूक समजून उमजून करावी. मानसिक ताण घेऊ नये. कार्य व अधिकार वाढतील. कौशल्याचा वापर करावा लागेल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर