Today Rashi Bhavishya, 26 August 2022 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष (Aries Horoscope Today ):-
अचानक येणार्या समस्येवर मात कराल. घरामध्ये शांत रहा. हिशोब करताना गडबड करू नका. कौटुंबिक कामे प्राधान्याने पूर्ण कराल. दिवसाचा उत्तरार्ध मजेत घालवाल.
वृषभ (Taurus Horoscope Today ):-
दिवस चांगला जाईल. मनातील इच्छा पूर्ण होईल. जोडीदाराबरोबर अनमोल क्षण घालवाल. दिवस प्रेमाने भरलेला राहील. व्यापारी वर्गाला लाभदायक दिवस.
मिथुन (Gemini Horoscope Today ):-
उत्तम वाचन होईल. घरातील कामात अडकून जाल. कौटुंबिक वातावरण खेळकर राहील. कामाची धांदल उडवून घेऊ नका. मित्रांशी सलोख्याचे संबंध ठेवावेत.
कर्क (Cancer Horoscope Today ):-
चांगले साहित्य वाचनात येईल. घरात समजुतीने वागा. अधिकार वाणीने बोलाल. जबाबदारी झटकू नका. दिवसभरात काही लाभही होतील.
सिंह (Leo Horoscope Today ):-
बोलण्यात स्पष्टता ठेवून बोलाल. कामाच्या ताणामुळे थकवा जाणवेल. हातातील कामे प्रामाणिकपणे व सचोटीने करावीत. अति विचारात वेळ वाया घालवू नका. आवडीवर पैसे खर्च कराल.
कन्या (Virgo Horoscope Today ):-
जोडीदाराच्या मताचा आदर करा. गैरसमजापासून दूर रहा. सामाजिक बांधीलकी जपा. उगाचच मन खिन्न होऊ शकते. व्यवहारी दृष्टीकोन ठेवावा.
तूळ (Libra Horoscope Today ):-
दिवसाची सुरुवात आळसात घालवू नका. जोडीदाराच्या इच्छेचा आदर कराल. कामातून अपेक्षित लाभ होईल. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नवीन योजनांवर काम चालू कराल.
वृश्चिक (Scorpio Horoscope Today ):-
सूर्याला नमस्कार करून दिवसाची सुरुवात करा. छंद जोपासायला वेळ काढावा लागेल. बोलताना समोरच्याचा आदर राखावा. व्यापार्यांनी भडक शब्द वापरू नयेत. एखादी घटना द्विधावस्था वाढवेल.
धनू (Sagittarius Horoscope Today ):-
बोलण्यातून बरेच प्रश्न मार्गी लागतील. विचारपूर्वक कार्य करा. मानसिक शांतता लाभेल. घरातील वातावरण शांत असेल. आर्थिक प्रश्न मार्गी लागतील.
मकर (Capricorn Horoscope Today ):-
ओळखीच्या व्यक्तीची मदत होईल. क्षुल्लक चूक टाळावी. नातेवाईक तुमच्यावर खुश होतील. जोडीदारासोबत उत्तम क्षण घालवाल. जवळचा प्रवास संभवतो.
कुंभ (Aquarius Horoscope Today ):-
दिवस शांततेत जाईल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. आहाराची पथ्ये पाळावीत. योग्य संधीची वाट पहावी. भावंडांची साथ मिळेल.
मीन (Pisces Horoscope Today ):-
शांतपणे बोलून कामे करून घ्या. तब्येतीत सुधारणा संभवते. घरातील गोष्टीत रमून जाल. मुलांबाबतचे मतभेद दूर होतील. सामाजिक मान-सन्मान वाढेल.
– ज्योतिषी विद्याधर करंदीकर