Dainik Horoscope Live Updates: ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा अभ्यास केला जातो. हे ग्रह वेळोवेळी नक्षत्र आणि राशी बदलतात ज्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होतो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव होईल याचा अंदाज व्यक्त केला जातो. तसेच ज्योतिष्यशास्त्र आधारे १२ राशींचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी अंदाज व्यक्त केला जातो. तसेत अंकशास्त्रानुसार, जन्मतारखेवरून व्यक्तीचा मुलांक शोधला जातो आणि त्यावरून स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी माहिती दिली जाते.चाणक्य नीति देखील व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयी माहिती मिळते. १२ राशींच्या भाग्यात काय होईल याबाबत दैनिक, साप्ताहिक, मासिक किंवा वार्षिक राशिभविष्याद्वारे सांगितले जाते.

Live Updates

Today's Horoscope 26 May 2025: आजचे राशिभविष्य  २६ मे २०२५:

16:26 (IST) 26 May 2025

Numerology Prediction : या तारखेला जन्मलेल्या लोकांवर हनुमानाची असते खास कृपा! भाग्यवान लोकांना मिळते धन-संपत्ती

Lord Hanuman Favourite Date Of Birth: अनेकदा आपण आपल्या नशिबाबद्दल प्रश्न विचारतो, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमची जन्मतारीख तुमच्या आयुष्याची दिशा आणि यश यावर देखील परिणाम करते? अंकशास्त्र हे एक असे शास्त्र आहे जे तुमच्या जन्मतारखेला जोडून तुमचा स्वभाव, करिअर, विचार आणि जीवनातील समस्यांचा अंदाज लावू शकते. विशेषतः ज्यांचा मूलांक क्रमांक ९ आहे, त्यांना भगवान हनुमानाचा विशेष आशीर्वाद असल्याचे मानले जाते. सविस्तर वाचा

16:07 (IST) 26 May 2025

मीन आजचे राशिभविष्य (Pisces Horoscope Today in Marathi)

जवळचे नातेवाईक भेटतील. मनातील आकांक्षा पूर्ण होतील. गुरूजनांच्या आशीर्वादाचा लाभ होईल. तुमच्यातील महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. 

15:45 (IST) 26 May 2025

कुंभ आजचे राशिभविष्य (Aquarius Horoscope Today in Marathi)

रागाच्या भरात कोणतेही कृती करू नका. बुद्धिकौशल्याचा योग्य वेळी वापर करावा. अचानक डोकेदुखीचा त्रास जाणवेल. कामात स्थिरता ठेवावी. कुटुंबात तुमचा दबदबा राहील.

15:32 (IST) 26 May 2025

मकर आजचे राशिभविष्य (Capricorn Horoscope Today in Marathi)

नातेवाईक तुमच्या विरुद्ध जाऊ शकतात. इतरांच्या अविश्वासाला बळी पडू नका. कोणाचाही सल्ला घेताना सावध राहा. अविचाराने वागून चालणार नाही. घेतलेल्या कष्टाचे चीज होईल.

15:12 (IST) 26 May 2025

Weekly Horoscope : या आठवड्यात ७ राशींच्या लोकांचे नशीब बदलणार! करिअरमध्ये होईल पदोन्नती, जाणून साप्ताहिक राशीभविष्य…..

Weekly Horoscope 26 May To 1 June 2025 : मे महिन्याचा शेवटचा आठवडा अनेक राशींच्या लोकांसाठी खास असू शकतो. २६ मे ते १ जून २०२५ या आठवड्यात शुक्राशिवाय इतर कोणत्याही राशीत मोठा बदल होणार नाही. या आठवड्याच्या मध्यात, धनदाता शुक्र मीन राशीतून बाहेर पडून मेष राशीत जाईल. सविस्तर वाचा

13:23 (IST) 26 May 2025

जमीनदाराप्रमाणे ऐशो-आरामाचे आयुष्य जगतात या तारखेला जन्मलेले लोक! अनेक शहरांमध्ये असते जमीन-मालमत्ता

Mulank 9 Prediction : ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ९, १८ किंवा २७ तारखेला होतो, त्यांचा मूळ अंक ९ असतो. ९ अंकाचा स्वामी मंगळ आहे. ...अधिक वाचा
12:33 (IST) 26 May 2025

१२ वर्षानंतर गुरू मिथून राशीत निर्माण करेल गजकेसरी राजयोग! 'या' ३ राशीच्या लोक जगतील ऐशो-आरामाचे आयुष्य, अचानक होईल धनलाभ

Gaj Kesari Rajyog 2025: देवांचा स्वामी गुरू ग्रह सुमारे एक वर्षानंतर राशी बदलतो, ज्याचा परिणाम १२ राशींच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या प्रकारे दिसून येतो. यावेळी गुरु गुरू मिथुन राशीत विराजमान आहे. १२ वर्षांनंतर बुध ग्रहावर परतल्याने काही राशींच्या राशींना बरेच फायदे मिळू शकतात. सविस्तर वाचा

12:14 (IST) 26 May 2025

धनू आजचे राशिभविष्य (Sagittarius Horoscope Today in Marathi)

इच्छेला मुरड घालावी लागेल. भावंडांशी वाद वाढवू नयेत. जुन्या कामात अधिक वेळ गुंतून पडाल. जोडीदाराच्या बुद्धिकौशल्याचे आश्चर्य वाटेल. काटकसरीवर भर द्यावा.

11:57 (IST) 26 May 2025

वृश्चिक आजचे राशिभविष्य (Scorpio Horoscope Today in Marathi)

जोडीदाराच्या इच्छेविरूद्ध जाऊ नका. कौटुंबिक वातावरण तप्त राहील. कामाचा विस्तार वाढवता येईल. भागीदारीत तुमच्या विचाराला प्राधान्य राहील. व्यावहारिक दृष्टीकोन ठेवावा लागेल.

11:29 (IST) 26 May 2025

कर्माचं फळ मिळणार! उद्या शनि जयंतीला ६ शुभ योग; 'या' राशीच्या व्यक्तींचा होणार भाग्योदय? शनिदेवाच्या कृपेने होऊ शकते धनवर्षा

Shani Jayanti 2025: उद्या शनि जयंतीला ६ शुभ योग जुळून येत आहेत. त्यामुळे काही राशींच्या लोकांवर ...अधिक वाचा
11:20 (IST) 26 May 2025

तूळ आजचे राशिभविष्य (Libra Horoscope Today in Marathi)

जोडीदाराच्या हट्टाला बळी पडाल. आवडते पदार्थ खाण्याची हौस पूर्ण होईल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. क्षुल्लक गोष्टींमुळे येणारा राग कमी करावा. नवीन ठिकाणी गुंतवणुकीला वाव आहे.

11:15 (IST) 26 May 2025

कन्या आजचे राशिभविष्य (Virgo Horoscope Today in Marathi)

जवळचा प्रवास मजेत पार पडेल. छंद जोपासला वेळ मिळेल. मानसिक स्थैर्य जपण्याचा प्रयत्न करावा. बाहेरील अन्न पदार्थ खाणे टाळावे. महत्त्वाची कागदपत्रे पुढे सरकतील.

09:36 (IST) 26 May 2025

Numerology Weekly Horoscope: या आठवड्यात या ५ मूलांकच्या लोकांना मिळेल धनसंपत्ती, करिअर चमकणार, जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य

Numerology Weekly Horoscope 26 May To 1 June 2025 : मूलांक १ ते मूलांक ९ पर्यंतच्या लोकांसाठी हा आठवडा कसा असेल हे जाणून घेऊया… ...सविस्तर बातमी
09:08 (IST) 26 May 2025

सिंह आजचे राशिभविष्य (Leo Horoscope Today in Marathi)

मित्र-मैत्रिणींचा फड जमवाल. आवडत्या ठिकाणाला भेट देण्याचे ठरवाल. पत्नीची नाराजी दूर करावी लागेल. घरगुती कामात दिवस जाईल. हाताखालील नोकरांचे सहकार्य लाभेल.

08:43 (IST) 26 May 2025

कर्क आजचे राशिभविष्य (Cancer Horoscope Today in Marathi)

कोणावरही जास्त विसंबून राहू नका. अधिकारी वर्गाचे मार्गदर्शन घ्यावे. मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाईल. स्त्री सौख्यात रमून जाल.

08:27 (IST) 26 May 2025

१२ वर्षानंतर गुरुच्या उदयामुळे सूर्याबरोबर निर्माण होईल महायुती! या ३ राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ: करिअर व्यवसायात होईल प्रगती, मेहनतीचे फळ मिळणार

Surya Jupiter Yuti 2025: जूनमध्ये ग्रहांचा राजा सूर्य आणि गुरु ग्रह यांच्यात युती होणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशींच्या लोकांवर दिसून येईल. ...अधिक वाचा
08:14 (IST) 26 May 2025

मिथुन आजचे राशिभविष्य (Gemini Horoscope Today In Marathi)

संभाषण कौशल्याची आवड पूर्ण कराल. विरोधकांचा विरोध मावळेल. कामात सहकार्‍यांची उत्तम साथ होईल. कामे दिरंगाईने होण्याची शक्यता. सामाजिक वादात अडकू नका.

08:07 (IST) 26 May 2025

वृषभ आजचे राशिभविष्य (Taurus Horoscope Today in Marathi)

मित्रांकडून लाभाची शक्यता. चेष्टा मस्करीत शब्द जपून वापरा. जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे लागेल. निसर्ग सौंदर्याचा अनुभव घ्याल. कामातील बदल व्यवस्थित लक्षात घ्या.

07:59 (IST) 26 May 2025

मेष आजचे राशिभविष्य (Aries Horoscope Today in Marathi)

नसते साहस करायला जाऊ नका. दूर वरच्या लोकांशी संपर्क वाढेल. मानसिक आंदोलने लक्षात घ्यावीत. आपणच आपल्या रागाला कारणीभूत होऊ शकतो. जमिनीच्या कामात लक्ष घालावे.

06:34 (IST) 26 May 2025

Daily Horoscope: शनि जयंतीला राशीनुसार तुम्हाला काय केल्यास होईल फायदा? तुमच्या नशिबाला मिळेल का कलाटणी?

Horoscope Today in Marathi, 26 May 2025 : २६ मे २०२५ रोजी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. चतुर्दशी तिथी दुपारी १२ वाजून १२ मिनिटांपर्यंत राहील, त्यानंतर अमावस्या सुरु होईल. सकाळी ८ वाजून २४ मिनिटांपर्यंत भरणी नक्षत्र जागृत असणार आहे. त्यानंतर कृतिका नक्षत्र सुरु जागृत असेल. आज सकाळी ७ वाजून १ मिनिटांपर्यंत शोभन योग जुळून येईल. राहू काळ ७ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते ९ वाजेपर्यंत असणार आहे. तसेच आज शनी जयंती सुद्धा असणार आहे. तर शनि जयंती आज कोणाच्या आयुष्यात सुख घेऊन येणार जाणून घेऊया…

Horoscope Today in Marathi Live 26 May 2025:

Today Horoscope 26 May 2025