Dainik Horoscope : ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा अभ्यास केला जातो. हे ग्रह वेळोवेळी नक्षत्र आणि राशी बदलतात ज्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होतो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव होईल याचा अंदाज व्यक्त केला जातो. तसेच ज्योतिष्यशास्त्र आधारे १२ राशींचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी अंदाज व्यक्त केला जातो. तसेत अंकशास्त्रानुसार, जन्मतारखेवरून व्यक्तीचा मूलांक शोधला जातो आणि त्यावरून स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी माहिती दिली जाते.चाणक्य नीति देखील व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयी माहिती मिळते. १२ राशींच्या भाग्यात काय होईल याबाबत दैनिक, साप्ताहिक, मासिक किंवा वार्षिक राशिभविष्याद्वारे सांगितले जाते.

Live Updates

Today's Horoscope Live 27 june 2025: आजचे राशिभविष्य लाईव्ह २७ जून २०२५:

19:16 (IST) 27 Jun 2025

आजचे मीन राशिभविष्य (Pisces Horoscope In Marathi)

क्रोध वृत्तीला आवर घालावी. जोमाने कामे पूर्ण कराल. मेहनतीला कमी पडू नका. सारासारविचार करून वागणे ठेवा. स्वतंत्र वृत्तीचा आग्रह धराल.

18:15 (IST) 27 Jun 2025

आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope In Marathi)

संपर्कातील लोकांची मदत मिळेल. चारचौघांत कौतुकास पात्र व्हाल. बौद्धिक दृष्टिकोन ठेवून विचार कराल. घरातील स्वच्छतेबाबत दक्षता बाळगाल. बागकामाची आवड जोपासाल.

18:02 (IST) 27 Jun 2025

आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope In Marathi)

धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. घरातील वातावरण मंगलमय राहील. भावंडांची चिंता लागून राहील. निरूत्साही भावना काढून टाका. शांत व संयमी विचार करावा.

17:34 (IST) 27 Jun 2025

आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope In Marathi)

अडचणीतून मार्ग काढणे क्रमप्राप्त आहे. कौटुंबिक खर्च वाढू शकतात. घरातील ज्येष्ठांच्या तब्येतीकडे लक्ष द्या. मदतीचा हात पुढे कराल. जोडीदाराची प्राप्ती वाढेल.

16:57 (IST) 27 Jun 2025

पैसा पैसा! १२ वर्षानंतर गुरू करणार कर्क राशीत प्रवेश! 'या' राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ, मिळेल पद-प्रतिष्ठा

Guru Gochar 2025: वैदिक ज्योतिषानुसार, गुरु ग्रह कर्क राशी मध्ये प्रवेश करेल, जे काही राशींच्या लोकांचे भाग्य उजळवू शकते. ...वाचा सविस्तर
16:56 (IST) 27 Jun 2025

आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope In Marathi)

नवीन कामातून समाधान मिळेल. जोडीदाराचा लाडिक हट्ट पुरवावा लागेल. वैवाहिक सौख्याने सुखावून जाल. छोट्या प्रवासाचे बेत आखाल. काही किरकोळ कौटुंबिक कटकटी राहतील.

16:33 (IST) 27 Jun 2025

आजचे तूळ राशिभविष्य (Libra Horoscope In Marathi)

आजचा दिवस चांगला जाईल. कामे अपेक्षित वेळेत पूर्ण होतील. उत्साह कमी पडू देऊ नका. नातेवाईकांशी मतभेदाचे प्रसंग येऊ शकतात. जवळच्या मित्रांचा गोतावळा जमवाल.

16:30 (IST) 27 Jun 2025

आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope In Marathi)

उगाचच मतभिन्नता दर्शवू नका. वादाच्या मुद्द्यापासून दूर राहावे. पोटाच्या तक्रारी वाढू शकतात. व्यापक दृष्टिकोन ठेवावा लागेल. सकारात्मक विचारांची जोड द्यावी.

14:08 (IST) 27 Jun 2025

Angarak Yog 2025 : सावधान! १ जुलैपासून 'या' ३ राशींच्या लोकांचं होणार मोठं नुकसान? अंगारक योगामुळे नोकरी, व्यवसायात येतील अडचणी

Mangal Ketu Angarak Yog 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, १ ते २८ जुलै या काळात सिंह राशीतील मंगळ-केतूच्या अंगारक योगानं काही राशींच्या लोकांच्या जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात. या राशींना त्याचा फटका सहन करावा लागू शकतो. ...सविस्तर बातमी
13:30 (IST) 27 Jun 2025
आजचे सिंह राशिभविष्य (Leo Horoscope In Marathi)

लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. दिवस मध्यम फलदायी राहील. किरकोळ इजांकडे दुर्लक्ष करू नका. कलेचे कौतुक केले जाईल. नवीन लोक संपर्कात येतील.

12:54 (IST) 27 Jun 2025

आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope In Marathi)

कौटुंबिक कामातून आनंद मिळेल. व्यवसायातून चांगला लाभ होईल. मनाजोगी खरेदी करता येईल. झोपेची काहीशी तक्रार जाणवेल. तब्येतीत सुधारणा होईल.

11:51 (IST) 27 Jun 2025

आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope In Marathi)

उगाचच निषेध नोंदवायला जाऊ नका. बौद्धिक चर्चेत सहभाग घ्याल. स्वत:चे मत ठसवून सांगा. अती चिकित्सा करू नका. वेळेचे योग्य नियोजन करा.

11:08 (IST) 27 Jun 2025

हंस महापुरूष राजयोग देणार नुसती चांदी; 'या' तीन राशींच्या व्यक्तींना पैसा, प्रेम अन् प्रत्येक कामात यश मिळणार

Mahapurush Rajyog: ऑक्टोबरमध्ये गुरू आपली उच्च राशी असलेल्या कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे. हा राजयोग १२ वर्षानंतर निर्माण होणार आहे. त्यामुळे काही राशींच्या व्यक्तींना त्याचा फायदा होईल. ...सविस्तर बातमी
11:04 (IST) 27 Jun 2025

आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope In Marathi)

परदेशातील आप्तांकडून शुभ वार्ता मिळतील. दूरच्या प्रवासाचे बेत आखाल. प्रत्येक गोष्टीचा रसास्वाद घ्याल. जवळच्या मित्राची नाराजी दूर करावी. मधुर वाणीने सर्वांना जिंकून घ्याल.

10:36 (IST) 27 Jun 2025

आजचे मेष राशिभविष्य (Aries Horoscope In Marathi)

कौटुंबिक चर्चेला प्राधान्य द्यावे. घरात काही नवीन बदल करण्याचा विचार कराल. कामातून मनाजोगे समाधान लाभेल. आळस झटकून टाकावा. मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल.

09:32 (IST) 27 Jun 2025

१०० वर्षानंतर शनी, मंगळ अन् केतुचा दुर्लभ संयोग; ‘या’ तीन राशींना पैसा अन् नोकरी, व्यवसायात यश देणार

Shadashtak Yog 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, ठराविक वेळेनंतर प्रत्येक ग्रहाचे राशी परिवर्तन किंवा नक्षत्र परिवर्तन होते. ज्याचा मानवी जीवनावर विशेष प्रभाव पाहायला मिळतो शिवाय काही ग्रहांची राशी परिवर्तनामुळे युतीदेखील निर्माण होते. सविस्तर वाचा

09:16 (IST) 27 Jun 2025

Monthly Rashifal July 2025: जुलै महिन्यात ९ राशींचे सुरू होणार चांगले दिवस! नव्या नोकरीसह धन लाभाचे योग, जाणून घ्या मासिक राशीभविष्य

२६ जुलै २०२५ रोजी बुधाचा मित्र शुक्र मिथुन राशीत प्रवेश करेल आणि शेवटी, २८ जुलै रोजी ग्रहांचा सेनापती मंगळ कन्या राशीत प्रवेश करत आहे. ...सविस्तर बातमी
09:05 (IST) 27 Jun 2025

Daily Horoscope: लक्ष्मी कृपेने ‘या’ राशींच्या भाग्यात होईल प्रेम व धनाचा वर्षाव; तुम्हाला कोणत्या रूपात मिळणार आशीर्वाद? १२ राशींचे भविष्य वाचा

Rashi Bhavishya In Marathi, 27 June 2025 : २७ जून २०२५ रोजी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीया तिथी आहे. सकाळी ७ वाजून २१ मिनिटांपर्यंत व्याघात योग जुळून येईल. सकाळी ११ वाजून १९ मिनिटांपर्यंत पुनर्वसु नक्षत्र जागृत असेल. राहू काळ १०:३० वाजता सुरु होईल ते १२ वाजेपर्यंत असणार आहे. तर आज कोणच्या घरी लक्ष्मी सोनपावलांनी येणार जाणून घेऊया सविस्तर जाणून घेऊ या...

08:57 (IST) 27 Jun 2025

भगवान जगन्नाथ यांना अत्यंत प्रिय आहेत ४ राशी! सुख-समृद्धीसह मिळतो पैसाच पैसा, ऐशो-आरामाचे आयुष्य जगतात

Bhagwan Jagannath Ki Priya Rashiyan: पुरीची रथयात्रा दरवर्षी भव्य पद्धतीने काढली जाते. भगवान जगन्नाथ, त्यांचे भाऊ बलभद्र आणि बहीण देवी सुभद्रा, ३ विशाल आणि भव्य रथांमध्ये विराजमान होत संपूर्ण शहरातून प्रवास करतात. दरवर्षी ही रथयात्रा आषाढ शुक्ल द्वितीयेला सुरू होते. यावर्षी ही रथयात्रा २७ जून २०२५ रोजी सुरू होईल. सविस्तर वाचा

Horoscope Today in Marathi Live 27 june 2025

आजचे राशीभविष्य, २७ जून २०२५ लाईव्ह (सौजन्य - फ्रिपीक)