Today Horoscope 06 August 2025 in Marathi: आज ६ ऑगस्ट २०२५ रोजी श्रावण शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे. द्वादशी तिथी दुपारी २ वाजून ९ मिनिटांपर्यंत राहील. त्यानंतर पूर्ण दिवस व रात्र संपवून ७ ऑगस्टच्या सकाळी ६ वाजून ४२ मिनिटांपर्यंत विष्कुंभ योग राहील. तसेच ६ ऑगस्टच्या दुपारी १ वाजेपर्यंत मूळ नक्षत्र असेल. याशिवाय ६ ऑगस्टला प्रदोष व्रत आहे. तसेच आज राहू काळ दुपारी १२ वाजता सुरु होईल ते १:३० वाजेपर्यंत असणार आहे. चला तर मग जाणून घेऊया, आजचा बुधवारचा दिवस १२ राशींसाठी नेमका कसा जाणार आहे.
०६ ऑगस्ट २०२५ राशिभविष्य व पंचांग (6 August 2025 Horoscope in Marathi)
आजचे मेष राशिभविष्य (6 August Zodiac Aries Horoscope)
जोडीदाराशी विचारपूर्वक वागावे. संयमाने परिस्थिती हाताळा. कार्यक्षेत्रातील बदलांकडे लक्ष ठेवा. काही बदल त्रस्त करू शकतात. संयमाने वागावे.
आजचे वृषभ राशिभविष्य (6 August Zodiac Taurus Horoscope)
आर्थिक आवक वाढेल. महत्त्वाच्या योजना मार्गी लागतील. सवयी बदलाव्या लागतील. मेहनतीला पर्याय नाही. यश विलंबाने पदरात पडेल.
आजचे मिथुन राशिभविष्य (6 August Zodiac Gemini Horoscope)
आवास्तव खरेदीचा मोह टाळायला हवा. आज प्रेमाची अनुभूति येईल. मनाची दोलायमानता सांभाळावी लागेल. सर्वांशी प्रेमळपणे वागाल. नकारात्मक विचार सोडून द्यावेत.
आजचे कर्क राशिभविष्य (6 August Zodiac Cancer Horoscope)
मनाची चंचलता आवरावी. नातेवाईकांशी संबंध दृढ होतील. वरिष्ठांना नाराज करू नका. आज केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. उगाच लपवाछपवी करू नका.
आजचे सिंह राशिभविष्य (6 August Zodiac Leo Horoscope)
तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. अथक मेहनतीचे चांगले फळ मिळेल. अनुभावातून धडा घ्यावा. मस्करीची कुस्करी होऊ देऊ नका. धार्मिक अनुष्ठानात दिवस घालवावा.
आजचे कन्या राशिभविष्य (6 August Zodiac Virgo Horoscope)
सामाजिक बांधीलकी जपावी. तुमच्याकडील कलेचे कौतुक केले जाईल. नातेवाईकांना सांभाळावे लागेल. थोडावेळ स्वत:साठी देखील काढावा. आपल्या कामाकडे दुर्लक्ष करू नका.
आजचे तूळ राशिभविष्य (6 August Zodiac Libra Horoscope)
गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. वैवाहिक जीवनात वादाचे प्रसंग येऊ शकतात. वादामुळे मन खिन्न होऊ शकते. इतरांवर विसंबून राहू नका.
आजचे वृश्चिक राशिभविष्य (6 August Zodiac Scorpio Horoscope)
मुलांशी वाद होऊ शकतो. भावनिक घटना घडू शकतात. कोणताही निर्णय घेताना सावध राहावे. घाईगडबड टाळावी. अचानक धनलाभाची शक्यता.
आजचे धनु राशिभविष्य (6 August Zodiac Sagittarius Horoscope)
घरातील वातावरण संमिश्र राहील. नवीन ओळखी वाढतील. जोडीदाराच्या प्रेम सौख्यात वाढ होईल. व्यावसायिक क्षेत्रातून लाभ होईल. भागिदारीतून नफा कमवाल.
आजचे मकर राशिभविष्य (6 August Zodiac Capricorn Horoscope)
कामासाठी बाहेर राहावे लागेल. स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी. घराबाहेर बेसावधपणे वागू नये. कामाचा बोजा वाढू शकतो. समस्येतून मार्ग निघेल.
आजचे कुंभ राशिभविष्य (6 August Zodiac Aquarius Horoscope)
सामाजिक कामात सहभाग घेऊ नका. दगदग व धावपळ टाळावी. मुलांमुळे घर खेळकर राहील. करमणुकीवर भर द्यावा.
आजचे मीन राशिभविष्य (6 August Zodiac Pisces Horoscope)
जोडीदाराच्या सहवासात रमून जाल. मनातील गैरसमज दूर होतील. आर्थिक चिंता मिटेल. मन प्रसन्न राहील. प्रलोभनापासून दूर राहावे.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर