मेष:-

सांपत्तिक दर्जा सुधारेल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. मनातील जुन्या इच्छा पूर्ण कराल. समाज कार्यात  हिरीरीने भाग घ्याल. उत्तम गुंतवणुकीचा मार्ग निवडाल.

A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
Sharad Pawars appeal to the youth to question to government regarding jobs and employment
आश्वासन वर्षाला दोन कोटी रोजगारांचे, प्रत्यक्षात नऊ वर्षांत सात लाखच नोकऱ्या; सरकारला जाब विचारण्याचे शरद पवार यांचे तरुणाईला आवाहन
mukhtar ansari umar ansari
“कट रचून विषप्रयोग केला”, मुख्तार अन्सारीच्या मुलाचे गंभीर आरोप; म्हणाला “तीन दिवसांपूर्वी त्यांनी…”

वृषभ:-

प्रत्येक गोष्टीत आनंदाने रस घ्याल. कपडे-लत्ते खरेदी कराल. महिला नटण्या मुरडण्याची हौस भागवतील. चार चौघांत मिळून मिसळून वागाल. वैवाहिक सौख्यात न्हाऊन  निघाल.

मिथुन:-

मनातील विचित्र कल्पना काढून टाकाव्यात. काही गोष्टींची गुप्तता पाळाल. व्यावसायिक प्रगतीच्या दृष्टीने पाऊल टाकाल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. मनात नसताना सुद्धा काही गोष्टी कराव्या लागतील.

कर्क:-

मित्रांच्या ओळखीचा फायदा होईल. जिथे जाल तिथे आनंद निर्माण कराल. कामातील गतीमानता वाढेल. वरिष्ठांची शाबासकी मिळवाल. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी.

सिंह:-

तुमचे कला गुण इतरांच्या समोर येतील. सर्वांच्या कौतुकाच्या विषय बनाल. व्यापारात चांगला फायदा होईल. आपल्या वागण्याने इतरांची मने जिंकून  घ्याल. बाहेरील अन्न पदार्थ टाळावेत.

कन्या:-

आवडते साहित्य वाचाल. विशाल दृष्टिकोन ठेवाल. आध्यात्मिक गोष्टींकडे कल वाढेल. कामात प्रगतीला वाव आहे. नवीन अनुभव गाठीशी बांधता येतील.

तूळ:-

कमी श्रमातून धनलाभ संभवतो. जोडीदाराची बौद्धिक बाजू दिसून येईल. वाहन चालवताना काळजी घ्यावी. काही कामे वेळे आधीच पूर्ण होतील. जोडीदाराची प्राप्ती वाढेल.

वृश्चिक:-

स्व कर्तृत्वावर कामे मिळवाल. काही गोष्टींचे चिंतन करावे. भावंडांचे प्रश्न मार्गी लावाल. मनातील नैराश्य बाजूला सारावे. प्रवासात खबरदारी घ्यावी.

धनू:-

कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा. खाण्या पिण्याचे पथ्य पाळावे. स्थावरची कामे पार पडतील. शक्यतो मोजक्या शब्दांत मत मांडा. डोळ्यांची काळजी घ्यावी.

मकर:-

प्रतिकूलतेतून मार्ग काढावा. करमणुकीच्या कार्यक्रमांचा आनंद घ्याल. रेस जुगारातून धनलाभ संभवतो. संभाषणाची  आवड पूर्ण कराल. तुमचे मत योग्य ठरेल.

कुंभ:-

कला गुण जोपासण्याचा प्रयत्न करावा. मनात उगाचच चिंता सतावेल. जामीनकीचे व्यवहार सावधगिरीने करावेत. हातापायांच्या दुखण्याकडे  दुर्लक्ष करू नका. घरगुती वातावरणात रमून जाल.

मीन:-

एकांगी विचार करू नका. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक कराल. गुंतवणुकीचे नवीन मार्ग शोधाल. कर्तव्याची जाणीव योग्य प्रकाराने  बजावाल. मित्रांच्या सहवासाचा लाभ होईल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर