Dainik Rashibhavishya Updates: ज्योतिषशास्त्रामध्ये, ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा आधारे व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होणाऱ्या प्रभावाचा अभ्यास केला जातो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव दिसून येईल तसेच अंकशास्त्र, चाणक्य नीति द्वारे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे या १२ राशींच्या भाग्यात आज काय लिहिले आहे, तेदेखील आपण जाणू घेणार आहोत.

Live Updates

Today’s Horoscope in Marathi : आजचे राशिभविष्य लाईव्ह १६ जून २०२५

17:53 (IST) 16 Jun 2025

येत्या चार दिवसांनी 'या' ३ राशींसाठी सुरू होणार संकटाचा काळ? शनी-मंगळाचा 'षडाष्टक योग' बनणार घातक! तुमच्या नशिबाचे काय होणार?

Shadashtak Yog 2025: शनी आणि मंगळ करणार षडाष्टक योग! शनी-मंगळ 'या' राशींना देणार मोठं नुकसान? घसरेल तब्येत, ओढवेल आर्थिक खडतर काळ! ...अधिक वाचा
16:37 (IST) 16 Jun 2025

दैनिक मीन आजचे राशिभविष्य (Dainik Pisces Horoscope In Marathi)

अचानक नवीन खर्च समोर येऊ शकतात. जोडीदाराच्या तब्येतीकडे विशेष लक्ष द्यावे. कौटुंबिक कामासाठी अधिक वेळ द्याल. सामाजिक गोष्टींचे भान राखून वागाल. आध्यात्मिक कामातून मनाला शांतता लाभेल.

16:16 (IST) 16 Jun 2025

दैनिक कुंभ आजचे राशिभविष्य (Dainik Aquarius Horoscope In Marathi)

भावंडांकडून चांगली बातमी मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करता येईल. व्यवसायात नवीन योजना आखाव्यात. कुटुंबियांशी वाद घालू नका. बोलण्यावर संयम ठेवावा लागेल.

15:49 (IST) 16 Jun 2025

१२ वर्षांनंतर हंस महापुरूष राजयोगामुळे 'या' ३ राशींचा सुरू होईल सुवर्ण काळ! गुरूची होईलअसीम कृपा, अचानक धनलाभाचे योग

गुरु ग्रह आता मिथुन राशीमध्ये भ्रमण करत आहेत आणि तो ऑक्टोबरमध्ये आपल्या राशि उच्च कर्कमध्ये प्रवेश करेल ज्यामुळे हंस महापुरूष राजयोग निर्माण होईल ...सविस्तर बातमी
15:42 (IST) 16 Jun 2025

बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी! पुढल्या ६ महिन्यांत 'या' चार राशी होणार लखपती? मिळणार चांगला पैसा, यश आणि प्रसिद्धी

Baba Vanga Predictions: ‘या’ भाग्यवान राशींवर पैशांचा पाऊस! बाबा वेंगांचा अंदाज थक्क करणारा...तुम्ही आहात काय भाग्यवान... ...अधिक वाचा
12:42 (IST) 16 Jun 2025

दैनिक मकर आजचे राशिभविष्य (Dainik Capricorn Horoscope In Marathi)

कामाचा जोम अधिक वाढेल. कुटुंबात तुमचा दरारा राहील. विचारांच्या गतीला आवर घालावी लागेल. सढळ हस्ते खर्च केला जाईल. परिस्थितीचा योग्य अंदाज बांधावा.

12:06 (IST) 16 Jun 2025

दैनिक धनू आजचे राशिभविष्य (Dainik Sagittarius Horoscope In Marathi)

आवक मर्यादित राहील. आर्थिक देवाणघेवाण करतांना सावध रहा. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. अधिकाराचा योग्य ठिकाणी वापर करावा. रेस, जुगार यातून लाभ संभवतो.

11:28 (IST) 16 Jun 2025

२८ नोव्हेंबरपर्यंत शनी महाराजांची कमाल! 'या' राशींना देणार नुसता पैसा? वक्री शनीच्या कृपेने श्रीमंतीचं स्वप्न कुणाचं होणार खरं?

Shani Dev Vakri 2025: वक्री शनीचा जबरदस्त प्रभाव! ‘या’ राशींना मिळणार अचानक धनलाभ, वेळच बदलणार!, पाहा तुम्ही आहात काय भाग्यवान... ...अधिक वाचा
11:26 (IST) 16 Jun 2025

दैनिक वृश्चिक आजचे राशिभविष्य (Dainik Scorpio Horoscope In Marathi)

व्यावसायिक कामातून मानसिक शांतता लाभेल. व्यक्तिगत छंद जोपासावेत. क्रोधाची भावना उचंबळू देऊ नका. क्षुल्लक चुका टाळण्याचा प्रयत्न करावा. अतिरिक्त खर्च टाळावा.

11:11 (IST) 16 Jun 2025

दैनिक तूळ आजचे राशिभविष्य (Dainik Libra Horoscope In Marathi)

जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. प्रेम प्रसंगात सावधानता बाळगा. आपल्यातील स्वाभाविक दोष टाळता आले तर पहावे. वरिष्ठांच्या सूचनेचे तंतोतंत पालन करावे. अचानक धनलाभाची शक्यता.

10:23 (IST) 16 Jun 2025

दैनिक कन्या आजचे राशिभविष्य (Dainik Virgo Horoscope In Marathi)

दृष्टीकोन बदलून पहावा लागेल. हातातील संधी जाऊ देऊ नका. अपचनाचा त्रास जाणवेल. माहितीच्या आधाराने कामात यश येईल. संपर्कात वाढ होऊ शकेल.

09:50 (IST) 16 Jun 2025

दैनिक सिंह आजचे राशिभविष्य (Dainik Leo Horoscope In Marathi)

घेतलेल्या कष्टाचे चीज होईल. अधिकार्‍यांना नाराज करू नका. जोडीदाराचा राग समजून घ्यावा लागेल. भागीदाराशी मतभेदाची शक्यता. कामाशिवाय इतर गोष्टी टाळाव्यात.

09:36 (IST) 16 Jun 2025

दैनिक कर्क आजचे राशिभविष्य (Dainik Cancer Horoscope In Marathi)

कार्यकालीन स्थितीवर लक्ष द्यावे. भावनाविवश होऊन विचार करू नका. मोठ्या वस्तूंची खरेदी कराल. थोडे अधिक श्रम घ्यावे लागू शकतात. दिवस कामात व्यतीत होईल.

09:07 (IST) 16 Jun 2025

दैनिक मिथुन आजचे राशिभविष्य (Dainik Gemini Horoscope In Marathi)

बौद्धिक कामात सावध राहावे. मोहाला बळी पडू नका. निर्णयात इतरांवर विसंबून राहू नका. व्यावसायिक आघाडीवर सतर्क रहा. वरिष्ठांच्या सहकार्यावर अवलंबून राहू नका.

08:51 (IST) 16 Jun 2025

दैनिक वृषभ आजचे राशिभविष्य (Dainik Taurus Horoscope In Marathi)

व्यवहारी दृष्टीकोनातून विचार कराल. कौटुंबिक गैरसमज टाळावेत. मानसिक चांचल्य जाणवेल. व्यवसायातून चांगली कमाई होईल. वसुलीत आनिश्चितता जाणवेल.

08:34 (IST) 16 Jun 2025

दैनिक मेष आजचे राशिभविष्य (Dainik Aries Horoscope In Marathi)

कुटुंबाच्या बाबतीत सौख्य जाणवेल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. मित्रांच्या गराड्यात राहण्याची इच्छा होईल. वरिष्ठांकडून सहकार्‍याची फार अपेक्षा ठेऊ नये. आपला ठसा उमटवण्याची संधी मिळेल.

08:17 (IST) 16 Jun 2025

३१ दिवसानंतर 'या' तीन राशींची होणार नुसती चांदी; सूर्याचा कर्क राशीतील प्रवेश देणार प्रत्येक क्षेत्रात यश

Surya Gochar in Kark: पंचागानुसार, नुकताच सूर्याने बुध ग्रहाच्या मिथुन राशीत प्रवेश केला असून सूर्य १६ जुलै २०२५ रोजी रात्री संध्याकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी कर्क राशीत प्रवेश करणार आहे. ...सविस्तर बातमी
07:56 (IST) 16 Jun 2025

Rashi Bhavishya: धनिष्ठा नक्षत्रात बरसणार सुखाच्या सरी? ‘या’ राशींचा आठवडा होईल आनंदाने सुरु, वाचा सोमवारचे राशिभविष्य

Daily Rashi Bhavishya in Marathi, 16 June 2025 : तुमच्या राशीची आठवड्याची सुरुवात कशी होणार जाणून घेऊया... ...सविस्तर बातमी

Horoscope Today in Marathi 16 April 2025

१६ जून राशिभविष्य (Photo Courtesy-Freepik)