Today Horoscope 23 August 2025 in Marathi: आज २३ ऑगस्ट २०२५ रोजी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी आहे. अमावस्या २२ तारखेला सुरू झाली असून २३ तारखेला सकाळी ११ वाजून ५५ मिनिटांपर्यंत राहील. आज मघा नक्षत्र जागृत असेल आणि परिघ योग जुळून येईल. तसेच आज राहू काळ दुपारी ०३ वाजून ३९ मिनिटांनी सुरु होईल ते ०५ वाजून १४ मिनिटांपर्यंत असणार आहे. चला तर मग जाणून घेऊया, आजचा शनिवारचा दिवस १२ राशींसाठी नेमका कसा जाणार आहे.
२३ ऑगस्ट २०२५ राशिभविष्य व पंचांग (23 August 2025 Horoscope in Marathi)
आजचे मेष राशिभविष्य (23 August Zodiac Aries Horoscope)
शांत राहून कामे करावीत. घरात बौद्धिक चर्चा होईल. नोकरीत बढतीचे योग आहेत. कार्यालयीन वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल. नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस.
आजचे वृषभ राशिभविष्य (23 August Zodiac Taurus Horoscope)
घरासाठी खर्च करण्याची तयारी ठेवा. बोलण्यातून इतरांची मने सांभाळून घ्याल. मानसिक शांतता लाभेल. कामात गतीमानता येईल. घरगुती प्रश्न मार्गी लावाल.
आजचे मिथुन राशिभविष्य (23 August Zodiac Gemini Horoscope)
उत्तम गुंतवणूक कराल. जवळच्या व्यक्तीचा सल्ला घ्याल. मित्रांशी मतभेदाची शक्यता. कामे वेळेत पूर्ण होतील. चमचमीत पदार्थांचा आस्वाद घ्याल.
आजचे कर्क राशिभविष्य (23 August Zodiac Cancer Horoscope)
अचानक धनलाभाची शक्यता. मानसिक संतुलन सांभाळा. मुलांकडून चांगले सहकार्य मिळेल. नवीन माहिती शोधण्यात वेळ घालवाल. नकारात्मक विचार दूर ठेवा.
आजचे सिंह राशिभविष्य (23 August Zodiac Leo Horoscope)
ठरवलेल्या गोष्टी पुढे ढकलू नका. जोडीदाराकडून अनपेक्षित लाभ होईल. घरात मंगल कार्याच्या योजना आखल्या जातील. मनोबल वृद्धिंगत होईल. मानसिक शांतता व प्रसन्नता वाढेल.
आजचे कन्या राशिभविष्य (23 August Zodiac Virgo Horoscope)
मनातील इच्छेवर ठाम राहाल. घरात शांतता नांदेल. कामातून मनाजोगे समाधान मिळेल. मुलांना नवीन गोष्टी शिकण्यास प्रवृत्त करा. प्रकृतीची हेळसांड करू नका.
आजचे तूळ राशिभविष्य (23 August Zodiac Libra Horoscope)
दिवस मजेत जाईल. जुगाराची हौस भागवाल. कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींकडे फार लक्ष देऊ नका. घरगुती गोष्टीत तडजोड करावी लागेल. कामाच्या ठिकाणी शब्दाला मान मिळेल.
आजचे वृश्चिक राशिभविष्य (23 August Zodiac Scorpio Horoscope)
शांत राहून कामाची पावती मिळवा. घरगुती खर्चाचा पुनर्विचार करा. व्यायामाची आवड लावून घ्या. मुलांवरील खर्च वाढू शकतो. हातातील कामात यश येईल.
आजचे धनु राशिभविष्य (23 August Zodiac Sagittarius Horoscope)
धार्मिक ग्रंथांचे वाचन वाढेल. चटकन नाराजी दर्शवू नका. गुंतवणुकीला चांगला वाव आहे. प्रवासाचे योग संभवतात. वरिष्ठांची मर्जी राखावी.
आजचे मकर राशिभविष्य (23 August Zodiac Capricorn Horoscope)
आवडी बाबत अधिक दक्ष राहाल. आरोग्याविषयी हलगर्जीपणा करू नका. खाद्य पदार्थांची रेलचेल राहील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. एखादे परिवर्तन चांगले असेल.
आजचे कुंभ राशिभविष्य (23 August Zodiac Aquarius Horoscope)
दिवस आनंदात घालवाल. जोमाने कामे करत राहाल. भागिदारीतून चांगले उत्पन्न मिळेल. योजलेल्या गोष्टी सुरळीत पार पडतील. क्षुल्लक गोष्टीवरून वाद घालू नका.
आजचे मीन राशिभविष्य (23 August Zodiac Pisces Horoscope)
मन शांत ठेवून निर्णय घ्या. आरोग्यात सुधारणा दिसून येईल. फार विचार करत बसू नका. चटकन आपले मत मांडू नका. बचतीच्या योजना आमलात आणा.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर